Superfoods To increase fertility in women: आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची भावना असते. परंतु आजकाल खराब जीवनशैली, चुकीच आहार, वाईट सवयी इत्यादींमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे महिला वंध्यत्वाच्या बळी ठरत आहेत. एका संशोधनानुसार, तणावामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते. जास्त तणावामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन होते. यामुळे स्त्रीला गर्भधारणा न होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
महिलांचा आहार हा जर परिपूर्ण असेल तर प्रजनन क्षमता नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते यात शंकाच नाही. आहार देखील या सगळ्या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. कारण आपण जो आहार घेतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपण काय खातो याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महिलांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे आज आपण जाणून घेऊया…
आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
- अंजीर
पोषणतज्ञांच्या यादीत अंजीर हे पहिले सुपरफूड आहे. इंसुलिन-कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे, अंजीर पीसीओएसमध्ये देखील फायदेशीर ठरू शकते जे वंध्यत्वात योगदान देते.
- डाळिंब
डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. डाळिंबात असलेले फोलेट आणि झिंक स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. ते आपल्याला मुक्त रॅडिकल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात, जे अंडी पेशी आणि शुक्राणू दोघांनाही नुकसान करतात. फळे, भाज्या, धान्ये आणि नट यांसारखे पदार्थ या फायदेशीर अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात.
आणखी वाचा : बद्धकोष्ठतेची समस्या आहे? तर ‘या’ घरगुती उपायांमुळे होईल पोट साफ
- गाईचं दूध
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी गायीचे तूप किंवा शुद्ध देशी तूप नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तुपामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. तुपात फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे लैंगिक आरोग्य सुधारतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- काजू
काजूमध्ये भरपूर झिंक असते, जे शरीराला मजबूत करण्यासाठी तसेच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असते. काजू व्यतिरिक्त तुम्ही डाळी, हरभरा, दही आणि डार्क चॉकलेटचा आहारात समावेश करू शकता.