आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचे मूळ हे अगदी १०-१५ वर्षांपासूनचे आपले खाणे-पिणे, आपल्या सवयी यात असते. पूर्वी कुपोषण हे फक्त आर्थिक चणचणीमुळे व्यवस्थित खाऊ न शकणाऱ्यांना होते अशी समजूत होती. परंतु सुखवस्तू लोकांना सुद्धा कुपोषण होतेच. फक्त चांगल्या राहणीमानामुळे ते दिसून येत नाही. आता हे कसे काय? ते पाहूयात…

१. प्रत्येक घरात एक खाण्या-पिण्याची पध्दत असते. शक्यतो गृहिणी जी रोज स्वयंपाक करते ती सुद्धा ते अलिखित नियम मोडू इच्छित नसते. त्यामुळे सगळे कायम फक्त आवडते तेच आणि त्याच त्या पद्धतीने अनेक वर्षे करत राहतात. आपल्याला वाटते आपण सगळ्यांचे चांगल्या पद्धतीने पोषण करतोय पण सगळ्यांच्या इच्छा पुरवताना आपणच आपल्या कुटुंबाचे नकळत कुपोषण करत असतो.

रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
non-vegetarian food, lunch boxes, food safety, danger zone temperature, bacteria, foodborne illnesses, Dt. Umang Malhotra, tiffin safety, Salmonella, food storage
टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Onion Mahabank is not viable even easier viable storage of onion is possible
कांदा महाबँक व्यवहार्य नाही, त्यापेक्षा ‘हे’ व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत

२. त्याच त्या पद्धतींमुळे पोषणतत्वे रोजच्या रोज पोटात जात नाहीत. उदा. काही घरांमध्ये रोज फक्त पोळी व कोरडी भाजी खाल्ली जाते. त्यात पातळ पदार्थाचा समावेश नसतो. याने होते काय तर कोरडे खाऊन पोट पटकन भरत नाही. त्यामुळे जास्त खाल्ले जाते. नको त्या कॅलरी पोटात जातात. काहीजण फक्त भाजी पोळी खातात. त्यांच्या रोजच्या जेवणात डाळी, कडधान्ये नसतात. शिवाय ते मांसाहार घेत नाहीत. मग अशा लोकांना प्रथिने कुठून मिळणार? पण ती त्यांची अनेक वर्षांची सवय असते.

३. आपण रोज जे बनवतोय त्याने फक्त पोटच भरतंय, तर पोषण आजिबात मिळत नाहीये! त्यामुळे जर घरातल्या गृहिणीने कोणकोणत्या पदार्थामधून कोणती पोषणमूल्य मिळतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर ते निश्चितच फायद्याचे ठरु शकते. यामध्ये आपल्या घरात कोणकोणत्या वयोगटाच्या व्यक्ती आहेत, त्यांची पोषणाची गरज काय आहे हे जाणून घेतले तर ती गृहिणी नक्कीच सगळ्यांच्या पोषणाच्या गरजा भागवू शकेल.

४. लहान मुले जर घरात असतील तर त्यांच्या प्रत्येक खाण्यातून त्यांना प्रथिने कशी देता येतील. मुले जे खात आहेत त्यातून त्यांना काय काय मिळणार आहे हे माहिती करून घेतले तर अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासही त्याची मदत होईल. शिवाय मोठेपाणी मधुमेहासारख्या आजारांना दूर ठेवायला शरीर तयार होईल.
५. काही घरांमध्ये सकाळी एकदाच स्वयंपाक केला जातो आणि तोच परत गरम करून खाल्ला जातो. एक वेळ पोळ्या चालू शकतील परंतु भाजी सकाळची रात्री फार काही पोषण देऊ शकणार नाही. शक्यतो ताजे खाणे जास्त उत्तम. विशेषतः जर लहान मुले घरात असतील तर ताजेच खावे.
६. मुले मोठ्यांचे अनुकरण करत असतात. म्हणून त्यांचे सगळ्यांकडे बारीक लक्ष असते. कोण काय काय खाते, कसे खाते इ. जर मुलांनी सगळे खावे अशी आपली इच्छा असेल तर मोठ्यांनीही सगळे खावे.

७. अनेकदा आपण एखादा पदार्थ बनवताना तो चविष्ट कसा होईल याकडेच जास्त लक्ष देतात. त्या भाजीत कोणता मसाला घालू हा प्रश्न आपल्याला पडतो. पण आपण कधी असा विचार केला का की या भाजीत काय घातल्याने ती जास्त पौष्टिक होईल. किंवा आजचे जेवण काय बनवू जेणेकरून त्यातून प्रथिने, कॅल्शियम, विटामिन्स मिळतील. जर असा विचार प्रत्येक गृहिणीने प्रत्येक पदार्थ बनवताना केला तर कुपोषण कोणाचेच होणार नाही.

८. आणखी एक गोष्ट पौष्टिक बनवण्यासाठी वेगवेगळे जिन्नस एकत्र करावे लागतील आणि या मुळे आपोआपच वेगळेच पदार्थ शोधले जातील बनवले जातील. उसळ भरून त्याचा पराठा मुलांना चीज किंवा बटर घालून दिला आणि त्याबरोबर लिंबू सरबत दिले तर मसुरातून लोह व प्रथिने मिळतील. पोळी मधून कर्बोदके व चीज मधून कॅल्शियम मिळेल. सरबतातून जीवनसत्व क मिळतं. शिवाय या सगळ्याने चवीत सुद्धा बदल होईल आणि घरातले सुद्धा गृहिणीवर खुश होतील. इतके सगळे निरनिराळे पदार्थ आई घरातच बनवू लागल्याने बाहेरचे खाण्याचे प्रमाण खूप कमी होईल.

 

श्रुती देशपांडे, आहारतज्ज्ञ