शांत, व्यत्ययरहित आणि लवकर झोप येण्यासाठी लोकरी पायजमे उत्तम असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे.
मुलायम लोकरीचा पायजमा परिधान करून झोपल्यास शांत झोप लागत असल्याचे सिडनी विद्यापीठाच्या मिरिम शिन म्हणाल्या.
लोकरी पायजम्यांचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे लवकर झोप येत असल्याचे शिन म्हणाल्या. ब्रिसबेन येथे शुक्रवारी शिन यांनी त्याच्या संशोधनावर मांडणी केली.
लोकरी पायजम्यामध्ये रोधन आणि अभिशोषण क्रियेचे गुण आसल्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
स्लिप डाऊन अंडर परिषदेमध्ये शिन यांनी हलक्या वजनाच्या व लांब लोकरी पायजमा परिधान केल्यावर कॉटनच्या पायजम्यांच्या तुलनेमध्ये लवकर व शांत झोप येत असल्याचे सांगितले.
सभोवतालचे तपमान १७ अंश सेल्सिअस असल्यावर प्रामुख्याने शांत झोप येते. मात्र, तपमानाचा ताबडतोब झोप येण्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे संशोधक दावा करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा