एका आठवड्यात ५५ तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱया व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका ३० टक्क्यांनी वधारत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
मधुमेह आणि काम करण्याचा वेळ यांच्यातील परस्पर संबंध जाणून घेण्याच्या उद्देशाने जगभरात २,२२,१२० जणांनी गोळा केलेल्या माहितीच्या जोरावर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार आठवड्याभरात ३५ ते ४० तास काम करणाऱयांच्या तुलनेत ५५ तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱया व्यक्तींना दोन प्रकारच्या मधुमेह व्याधीचा धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. वय, लिंग, लठ्ठपणा यांच्यासह धुम्रपान आणि शारीरिक हालचाली यांचाही विचार या विश्लेषणात करण्यात आला परंतु, कामाच्या वेळेचा मधुमेहाचा धोका वाढवण्यास कारण ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच याबाबतीत व्यक्तीचे वय,लिंग,लठ्ठपणा यांच्यात फरक असला तरी, आठवड्यात ५५ तासांपेक्षा अधिक काळ काम करणाऱयांना मधुमेहाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा