रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वागवे ठरणार नाही. दरम्यान रक्तदात्याला रक्तदान करण्यास व नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेने १४ जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ए, बी, ओ या रक्तगटांचा शोध लावणारे तसेच नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या १४ जून १८६८ या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
डॉ संदीप जस्सल यांच्या सांगण्यानुसार, बर्याच वेळा, जिवावर बेतात असलेल्या व आजारानं पीडित रूग्ण रक्तदानाद्वारे वाचू शकतो. मात्र या बरोबर हे देखील माहित असले पाहिजे की रक्तदानामुळे केवळ लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात.
दरवर्षी, 14 जून रोजी जागतिक रक्तदान हा दिवस साजरा केला जातो आणि आवश्यक असणाऱ्या रुग्णांना सुरक्षित रक्तदान करून नियमितपणे रक्तदान करण्याची जागरूकता करणे फार महत्त्वाचं आहे. हा दिवस रक्ताची जीवनरक्षक भेट दान करण्यासाठी दात्यांचे आभार मानण्याचा देखील एक खास दिवस आहे. तर एकीकडे इतरांना रक्तदान करण्यासाठी असे महान कौतुक कार्य करण्यासअनेक स्वयंसेवी संस्था नेहमी तत्पर असून या पुढे सरसावत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. बर्याच वेळा, जीवघेणा परिस्थितीत पीडित रूग्ण रक्तदानाद्वारे वाचू शकतो. परंतु हे देखील ठाऊकच आहे की रक्तदान केवळ जीव वाचविण्यासच मदत करत नाही तर रक्तदात्यासाठी त्याचे काही आरोग्यविषयक फायदे देखील आहेत. डॉक्टर संदीप जस्सल यांच्या सांगण्यानुसार आहेत रक्तदान करण्याचे पाच फायदे ….
1)वजन कमी करणे:
वेळेवर रक्तदान केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि निरोगी प्रौढांमध्ये तंदुरुस्ती वाढते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, एक पिंट किंवा ४५० मिली रक्तदान केल्याने आपल्या शरीरास सुमारे 650 कॅलरी जळण्यास मदत करते. परंतु म्हणून वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाऊ नये. आरोग्याचा कोणताही त्रास टाळण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
2)हेमोक्रोमेटोसिस रोखते:
रक्तदान केल्याने जोखीम कमी होते किंवा हेमोक्रोमेटोसिसच्या विकासास प्रतिबंध होऊ शकतो, अशी स्थिती ज्यामध्ये शरीर लोहाचे अत्याधिक शोषण करते. नियमित रक्तदान केल्यामुळे लोहाचे ओव्हरलोड कमी होते, म्हणूनच हे हेमोक्रोमाटोसिस असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तथापि, रक्तदानाच्या पात्रतेच्या निकषांचे अनिवार्य मानदंड रक्तदात्याने हीमोक्रोमेटोसिसने पूर्ण केले आहेत हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
3)हृदयरोगाचा धोका कमी करा:
नियमित रक्तदान केल्याने लोहाची पातळी कमी राहते आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शरीरात मोठ्या प्रमाणात लोह तयार होण्यामुळे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते जे हृदयविकाराचा झटका येण्यामागे कारण असू शकते.
4)कर्करोगाचा कमी धोका:
शरीरात लोहाचे जास्त प्रमाण म्हणजे कर्करोगाचे आमंत्रण होय. रक्तदानाद्वारे आपण लोहाची निरोगी पातळी राखू शकता आणि त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका कमी होईल
5)नवीन रक्त पेशींचे उत्पादन वाढवा:
रक्तदानामुळे नवीन रक्तपेशींचे उत्पादन वाढते. रक्तदान केल्यानंतर, अस्थिमज्जांच्या सहाय्याने आपल्या शरीरामधल्या कार्यप्रणाली ४८ तासांमध्ये काम करायला लागतात आणि नवीन रक्त पेशी तयार होतात. रक्तदानात गमावलेल्या सर्व लाल रक्तपेशी ३० ते ६0 दिवसांच्या कालावधीत बदलल्या जातात. म्हणून, रक्तदान केल्याने महत्त्वपूर्ण आरोग्य टिकविण्यात मदत होते.
अशा रीतीने डॉ संदीप जस्सल यांच्या सांगण्यानुसार जाणून घेतलेल्या या रक्तदानाचे फायदे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकांनी रक्तदान केले पाहिजे. सध्या करोनाच्या परिस्थित रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे सगळ्यांनी पुढाकार घेऊन अनेकांना जीवनदान देऊया……