डॉ. शिशिर शेट्टी
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सामान्यतः आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. 50 वर्षे वयाच्या पुढील महिलांमध्ये बहुतांश केसेस दिसून येतात. परंतु, ब्रेस्ट कॅन्सर तरुण महिलांनाही होऊ शकतो. ब्रेस्टमध्ये गाठ किंवा कोणताही बदल झाल्याचे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जायला हवे. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास तो बरा होऊ शकतो.
प्रकार:
डक्टल कॅर्सिनोमा – ब्रेस्ट कॅन्सरचा सामान्यतः आढळणारा प्रकार म्हणजे डक्टल कॅर्सिनोमा. ब्रेस्ट डक्टशी संबंधित असणाऱ्या पेशींमध्ये कॅन्सरची सुरुवात होते. ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या 10 पैकी 7 महिलांना डक्टल कॅर्सिनोमा होतो.
लॉब्युलर कॅर्सिनोमा – ब्रेस्ट कॅन्सरचा सामान्यतः आढळणारा दुसरा प्रकार म्हणजे लॉब्युलर कॅर्सिनोमा. हा कॅन्सर ब्रेस्टमधील लॉब्युलमध्ये सुरू होतो. 10 मधील 1 स्त्रीला लॉब्युलर कॅर्सिनोमा ब्रेस्ट कॅन्सर होतो.
स्क्रीनिंग:
• ब्रेस्ट परीक्षण – तुमचे डॉक्टर दोन्ही ब्रेस्ट व काखेतील लिम्फ नोड तपासतील, काही गाठ आहे का किंवा असाधारण स्थिती आहे का पाहतील.
•डिजिटल मॅमोग्राम – मॅमोग्राम म्हणजे ब्रेस्टचा एक्स-रे. ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यासाठी मॅमोग्रामची मदत घेतली जाते
• ब्रेस्ट अल्ट्रासाउंड – शरीरातील खोलवर असणाऱ्या रचनांची इमेज तयार करण्यासाठी अल्ट्रासाउंड लहरींचा वापर केला जातो. अल्ट्रासाउंडमुळे सॉलिड मास व द्रवपदार्थ असणारी गाठ यातील फरक अधोरेखित होऊ शकतो. नव्या गाठीची तपासणी करत असताना सहसा अल्ट्रासाउंडची मदत घेतली जाते.
आणखी चाचण्या करण्याची आवश्यकता आहे, असे डॉक्टरांना वाटल्यास बायॉप्सी करावी लागू शकते. त्यावरून, पेशी कॅन्सरच्या आहेत की नाही ते तपासता येते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये समाविष्ट असणाऱ्या पेशी ठरवणे, कॅन्सरचा आक्रमकपणा (ग्रेड) ठरवणे व कॅन्सर पेशींमध्ये हॉर्मोन रिसेप्टर्स व अन्य रिसेप्टर्स असू शकतात का ज्यामुळे उपचार पद्धतीवर परिणाम होऊ शकतो हे शोधणे, यासाठी बायॉप्सी नमुन्याचे विश्लेषण केले जाते.
तपासणी करण्याबरोबरच, नियमितपणे ब्रेस्ट स्वयं-परीक्षण करावे व पुढीलप्रमाणे लक्षणे दिसतात का ते पाहावे:
• ब्रेस्टमध्ये गाठ किंवा आजूबाजूच्या पेशींच्या तुलनेत जाडसरपणा
• निपलमधून रक्त येणे
• ब्रेस्टचा आकार, प्रमाण वाढ दिसणे यामध्ये फरक होणे
• ब्रेस्टवरील त्वचेमध्ये बदल
• इन्व्हर्टेड निपल
• निपल किंवा ब्रेस्ट स्किनच्या आजूबाजूच्या पिग्मेंटेड क्षेत्राची साले जाणे, स्केलिंग वा फ्लेकिंग
• मॅमोग्राम नॉर्मल येऊनही ब्रेस्टमध्ये गाठ किंवा अन्य बदल आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
जोखमीचे घटक
ब्रेस्ट कॅन्सर किंवा अन्य कॅन्सरची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर बीआरसीएमधील विशिष्ट बदल किंवा अनुवंशिकतेमुळे आलेले काही जिन्स सजमून घेण्यासाठी तुम्ही जेनेटिक समुपदेशन करून घ्यावे आणि गरज वाटल्यास चाचणी करून घ्यावी.
ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असणारे घटक:
• वाढते वय
• रेडिएशन
• स्थूलता
• मासिक पाळी लवकर सुरू होणे
• मेनॉपॉज उशिरा सुरू होणे
• मेनॉपॉजनंतर हॉर्मोन थेरपी
• धूम्रपान
• अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन
उपचार:
ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार, त्याचा टप्पा व ग्रेड, आकार, तसेच कॅन्सर पेशी हॉर्मोनसाठी संवेदनशील आहेत का, यावर अवलंबून असतात. ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या महिलांसाठी उपचारांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. उपचारांमध्ये पुढील पर्याय समाविष्ट आहेत:
· सर्जरी
· रेडिएशन थेरपी
· हॉर्मोन थेरपी
· केमोथेरपी
· टार्गेटेड थेरपी
तुम्हाला एकापेक्षा अधिक प्रकारचे उपचार घेता येऊ शकतात. बहुतांश महिला ब्रेस्ट कॅन्सरवर सर्जरी करून घेतातआ आणि सर्जरीपूर्वी किंवा नंतर केमोथेरपी, हॉर्मोन थेरपी किंवा रेडिएशन असे अतिरिक्त उपचारही करू घेतात.
ब्रेस्ट कॅन्सरसाठी सर्जिकल पर्याय:
• ब्रेस्ट कन्व्हर्सेशन सर्जरीला ब्रेस्ट-स्प्रेइंग सर्जरी किंवा वाइड लोकल एक्सिजन असेही म्हणतात. त्यामध्ये सर्जन अॅक्झिलरी नोंड्सने ट्युमर व आजूबाजूच्या थोड्या निरोगी पेशी काढून टाकतात
• संपूर्ण ब्रेस्ट काढून टाकणे (मॅस्टेक्टॉमी) – सर्व ब्रेस्ट टिश्यू व अॅक्झिलरी नोड्स काढून टाकण्यासाठी ही सर्जरी केली जाते
• दोन्ही ब्रेस्ट काढून टाकणे – एका ब्रेस्टमध्ये कॅन्सर झालेल्यांना काही स्त्रियांना कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे किंवा जेनेटिक प्रिडिस्पोझिशनमुळे दुसऱ्या ब्रेस्टमध्येही कॅन्सर होण्याची जोखीम जाणवली तर त्या दुसरा (निरोगी असणारा) ब्रेस्टही काढून टाकायचे ठरवतात (कॉन्ट्रालॅटरल प्रॉफिलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी).
(लेखक अपोलो हॉस्पिटल्समध्ये सर्जिकल ओन्कोलॉजी म्हणून कार्यरत आहेत.)