कधीही धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि वायुप्रदूषण या वाढीस कारणीभूत ठरू शकते, असा धक्कादायक खुलासा एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC)मधील संशोधकांनी ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी २०२२’ डेटासेटमधील माहितीचे विश्लेषण केले. ‘एडेनोकार्सिनोमा’ (adenocarcinoma), ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ (squamous cell carcinoma), ‘स्मॉल अॅण्ड लार्ज सेल कार्सिनोमा’ (small- and large-cell carcinoma) या चार उपप्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावरील फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला.

‘द लॅन्सेट संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

संशोधनातून असे आढळून आले की, ‘एडेनोकार्सिनोमा’ हा कर्करोग श्लेष्मा आणि पाचक ग्रंथींसारख्या द्रवरूप पदार्थ निर्माण करणाऱ्या ग्रंथींमध्ये (glands) सुरू होतो. कर्करोगाचा हा प्रमुख उपप्रकार पुरुष आणि महिला अशा दोघांमध्येही आढळून येतो.
जागतिक स्तरावर २०२२ मध्ये, कधी धूम्रपान न करणार्‍यांमध्ये आढळून आलेली फुप्फुसाच्या कर्करोगाची ५३-७०% प्रकरणे ही एडेनोकार्सिनोमा या फुप्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित होती.

धुम्रपान करणाऱ्यांना या कर्करोगाचा धोका कमी

इतर प्रकारांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये एडेनोकार्सिनोमामुळे फुप्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी आहे.

फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले

जगभरातील अनेक देशांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण कमी होत असताना, कधीही धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.

फुप्फुसांचा कर्करोग हा कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. पण, जागतिक स्तरावर धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होणे हे कर्करोगाने होणार्‍या मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरत आहे. हा कर्करोग जो सामान्यत: एडेनोकार्सिनोमा म्हणून होतो आणि महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांना विषमतेने प्रभावित करतो.

“२०२२ मध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार “महिलांमध्ये जगभरात फुप्फुसाच्या कर्करोगाचे ९,०८,६३० नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी ५,४१,९७१ रुग्ण (५९.७ टक्के) हे एडेनोकार्सिनोमाचे होते. त्याशिवाय २०२२ मध्ये जागतिक स्तरावर एडेनोकार्सिनोमाचे निदान झालेल्या महिलांपैकी ८०,३७८ महिलांना वातावरणातील कणांच्या प्रदूषणामुळे (ambient particulate matter (PM)) संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

ब्रे म्हणाले, “अलीकडच्या पिढ्यांमध्ये पुरुष आणि महिलांमधील कर्करोगाच्या ट्रेंडमधील हा फरक, तज्ज्ञ व धोरणकर्त्यांना तंबाखू आणि वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, विशेषतः उच्च-जोखीम गटांसाठी लक्ष्य करूण धोरणे तयार करण्यास मदत करू शकतो.”

२०१९ पर्यंत जागतिक लोकसंख्येचा मोठा भाग – जवळजवळ प्रत्येक जण – अशा भागात राहत होता, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले.