करोना महामारीच्या जागतिक संकटानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आरोग्याचं महत्त्व कळलं आहे. वजन कमी करण्यापासून आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा याची प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा ही म्हण आरोग्याच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. आज जागतिक आरोग्य दिन साजरं करत असताना आरोग्य आणि संतुलित जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. करोनानंतर विकार टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. आपण दररोज खात असलेल्या विविध पदार्थांमध्ये आपल्याला जीवनसत्व मिळतात. आता उन्हाळा सुरु असल्याने थकवा जाणवतो. या काळात तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
- ‘क’ जीनवसत्व असलेली फळे: लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि इतर अनेक पोषक तत्त्वे असतात. कामाच्या आधी किंवा उठल्यानंतर एक ग्लास मध लिंबू पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होईल. यामुळे उर्वरित दिवसासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल.
- फळांचा रस: उन्हाळ्यात रोगांशी लढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही. ताज्या फळांचे रस नियमितपणे पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
- दही: उन्हाळ्यात दही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर तुमचे पचन, हृदय आणि ऍलर्जी नियंत्रणात ठेवते. तुम्ही दुपारच्या जेवणासोबत साइड डिश म्हणून दह्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता किंवा त्यात थोडा मध टाकून मिष्टान्न म्हणूनही त्याचा आनंद घेऊ शकता.
- ग्रीन टी: मसाला चहा आणि कॉफी यांसारख्या गरम पेयांना आरोग्यदायी पर्याय म्हणून ग्रीन टी लोकप्रिय आहे. ग्रीन टी केवळ वजन राखण्यात किंवा कमी करण्यात मदत करत नाही तर मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास देखील मदत करते. उन्हाळ्यात उबदार पेयांचा आस्वाद घेणाऱ्या लोकांसाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
World Health Day 2022: म्हणून साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन, जाणून घ्या सुरुवात कशी झाली ?
- आले: आले आरोग्यवर्धक आहे. यात पोषणमूल्य खूप जास्त असते आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. शरीराला कोणत्याही आजारांपासून किंवा रोगांच्या वाहकांपासून संरक्षण करण्यास मदत करते. तुमच्या फळांच्या किंवा भाज्यांच्या रसामध्ये काही आले मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.
- लसूण: आल्याप्रमाणेच लसूण देखील आरोग्यवर्धक आहे. तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. लसणामध्ये उत्कृष्ट उपचार गुणधर्म आहेत.
- बटण मशरूम: बटन मशरूममध्ये रिबोफ्लेविन आणि नियासिनचे प्रमाण जास्त असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तुम्ही मशरूम करी बनवून किंवा ब्रेकफास्ट टोस्टसाठी टॉपिंग म्हणून तुमच्या आहारात बटन मशरूमचा समावेश करू शकता.
- रताळे: रताळे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. बटाट्याचा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे .