“तणावांमुळे हृदयाचे आजार होतात!” हे वाक्य जरी आपण डॉक्टर, मित्र आणि कुटुंबीयांकडून दररोज ऐकले असेल. पण हे जैविक आणि वैद्यकीय संशोधनावर आधारावर सांगितले जाते. आहे. तणाव हा चिंता आणि भितीदायक स्थितीमध्ये आपल्या शरिराकडून मिळणारी प्रतिक्रिया आहे. वाघ पाठीमागे लागल्यासारख्या परिस्थितीमध्ये, जेव्हा आपल्या समोर आलेल्या परिस्थतीचा सामना करायचा असतो अशा स्थितीमध्ये आपले शरीर त्वरित प्रतिक्रिया देते. यालाच आपण आल्पकालीन ताण येतो.
भयावह परिस्थिती संपल्यानंतर शरीर आपोआप सामान्य स्थितीत येते. पण आल्पकालीन ताण जात नसेल तर काय करावे?तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या शरीरात दोन हार्मोन्स कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन सोडले जातात. कॉर्टिसॉल तणाव परिस्थितीत साखरेला उर्जेचा स्रोत म्हणून सोडण्यात मदत करते, तर अॅड्रेनालाईन शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाहाला प्राधान्य देण्यासाठी मदत करते. जसे की पायांमधील स्नायू, इतर रक्तवाहिन्या आकुंचन पावते आणि हृदय गती वाढवते ज्यामुळे अतिरिक्त ऑक्सिजनयुक्त रक्त तयार होते आणि ते स्नायूंपर्यंत पोहोचू शकते. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे उच्च रक्तदाब होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा