World Heart Day 2023 : झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. चांगल्या झोपेमुळे तुम्ही नेहमी निरोगी राहता. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण अपुरी झोप घेतात आणि याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात. जेव्हा शरीर थकलेले असते, तेव्हा शरीराला झोपेची आवश्यकता असते.
तज्ज्ञांच्या मते झोपेच्या कमतरतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये एथेरोस्क्लेरोसिस दिसून येतो. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. OSA सारख्या झोपेच्या आजारांमुळेही अनेकांची झोप नीट होत नाही. OSA आजारांमध्ये श्वासनलिका वारंवार एकमेकांवर आदळतात, त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : स्त्रिया भांगामध्ये कुंकू का लावतात, जाणून घ्या वैज्ञानिक कारण

कमी झोपेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन झोपेचे महत्त्व समजून घ्या

  • चांगल्या आरोग्यासाठी झोप ही अत्यंत आवश्यक आहे. झोपायची वेळ ठरवली पाहिजे. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे, ही आरोग्यासाठी चांगली सवय आहे.
  • उत्तम आरोग्यासाठी कमीत कमी सात तास झोप घेणे आवश्यक आहे. सात तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर तुमच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम दिसू शकतात. अपूर्ण झोपेमुळे तणाव वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी रात्री शरीराला आराम देणे आवश्यक आहे.
  • उत्तम आहार आणि व्यायामामुळे तुमचे आरोग्य सुधारते. जर तुम्ही भरपूर पोषक तत्वे असलेला आहार घेत असाल तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर थकेल आणि तुम्हाला रात्री लवकर झोप येऊ शकते.
  • जर तुम्हाला झोपेसंबंधित समस्या असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा किंवा हृदयाशी संबंधित आजार असतील तर चांगल्या झोपेसाठी हृदय तज्ज्ञांबरोबर बोला.
  • सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत काम आणि जबाबदारीमुळे स्ट्रेस दिसून येतो. कमी झोपेमुळेसुद्धा स्ट्रेस वाढतो. अशात स्ट्रेस कमी करण्यासाठी नियमित ध्यान करा. याशिवाय धूम्रपान करणे टाळा. धूम्रपान हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World heart day 2023 know interrelationship between sleep and heart poor sleep affected on your heart health ndj