World Heart Day 2023: अगदी कमी वयातच हृदय विकाराचा झटका आल्याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात झालेला बदल, कामांचे बदललेले स्वरूप आणि वेळा, खाणापानाच्या सवयी यामुळे आपसूकच अनेक आजारांना निमंत्रण मिळते. यापैकीच एक चिंताजनक बाब म्हणजे हृदयविकारांना मिळालेले निमंत्रण. काही साध्या- सोप्या गोष्टींचे आपण पालन केले तर नक्कीच दिलकी धडकानोंको जवान रखना आसान है… म्हणूनच तर हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही योगासने नियमितपणे केली पाहिजेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारण योगा केवळ वेटलॉससाठी नाही. योगा केल्यामुळे विविध अवयवांचे, इंद्रियांचे काम सुरळीत चालते आणि त्यामुळे आपण अधिकाधिक फिट होतो. काही योगासनांमुळे रक्ताभिसरण संस्थेचे कार्य सुधारते आणि त्यामुळे हृदय देखील अधिक कार्यक्षम होते

ताडासन: ताडासनाला माउंटन पोज असेही म्हणतात. यामुळे शरीरातील मुद्रा आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. ताडासन हृदय गती सुधारण्यासाठी ओळखले जाते.

वृक्षासन: अस्थिर, चंचल मनाला शांत करण्याचे काम वृक्षासन करते. वृक्षासनामुळे एकाग्रता साधता येते. मन एकाग्र आणि शांत असणे म्हणजेच हृदयाचे कार्य उत्तम असणे. शांत मनामुळे हृदय देखील निरोगी राहते. त्यामुळे नियमितपण वृक्षासन करून मन शांत आणि हृदय निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

त्रिकोणासन: या आसनामध्ये शरीराचा आकार त्रिकोणी होतो, म्हणून त्यास त्रिकोणासन म्हणतात. कंबरेचे दुखणे असणाऱ्यांसाठी आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन महत्त्वाचे आहे. या आसनामुळे कंबरेचे स्नायू लवचीक व मजबूत बनतात. या आसनामुळे पचनक्रियाही सुधारते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि शरीर सुडौल करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

भुजंगासन: कोब्रा पोज म्हणजे भुजंगासन केल्याने हृदय मजबूत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक होतो. भुजंगासनामुळे पाठदुखीमध्येही आराम मिळतो. भुजंगासनामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

पश्चिमोत्तानासन: पाय लांब करून आसन सुरू करा. आपले हात वर करा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. श्वासोच्छ्वास करा आणि पुढे वाकून आपले वरचे शरीर खाली करा. आपली बोटे धरण्याचा प्रयत्न करा.

धनुरासन: धनुरासन करण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहाते आणि पचनतंत्र तसंच हाडांसाठी याचा फायदा होतो. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते. पण धनुरासन करण्यापूर्वी तुम्हाला याबाबत महत्त्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात.

सुखासन: सुखासनात बराच वेळ बसून हळूहळू तुमचे विचार कमी होऊ लागतात आणि कमी विचारांमुळे तुमचे मन शांत होते आणि जर तुमचे मन शांत असेल तर तुमचे मेंदू शांत होईल ज्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. हे आसन मनाला अतिरिक्त शांती देते. जर तुम्हाला खूप थकवा येत असेल तर या आसानामुळे आराम मिळेल.

हेही वाचा >> World Heart Day 2023: जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि इतिहास

शवासन: शव म्हणजे शरीराची मृत अवस्था. मृत अवस्थेत शरीर कोणत्याही प्रकारची हालचाल करू शकत नाही. शवासनात माणसाचे शरीर मृत अवस्थेप्रमाणे दिसत असते. यासाठीच इंग्रजीमध्ये या आसनाला असे म्हणतात. कारण या आसनामध्ये कोणतीही हालचाल न करता फक्त निपचित पडून राहायचे असते. शिवाय या आसनामध्ये विचार करायचे नसतात. म्हणून या आसनाला शवासन असे म्हणतात. मात्र असं असलं तरी यात घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट शवासन करण्याचे शरीरावर अनेक फायदे होतात. शरीर निवांत आणि मन शांत होतं. यासाठीच व्यायामनंतर आणि कठीण श्रम केल्यावर शवासनाचा सराव करावा. ज्यामुळे शरीरातील सर्व स्नायू शिथिल होतात आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World heart day 2023 yoga asanas for heart these 5 yogasanas will keep the heart fit srk