World Kidney Day 2022: किडनी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. ते शरीरातून कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात. यासह, ते पाणी, क्षार आणि खनिजांचे निरोगी संतुलन राखण्यासाठी आम्ल काढून टाकण्यास मदत करतात. हे जाणून घ्या की या निरोगी संतुलनाशिवाय, तुमच्या नसा, स्नायू आणि इतर शरीराच्या ऊती योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपली किडनी खराब होते आणि या खूप सामान्य सवयी आहेत.
झोपेची कमतरता
आजकालची जीवनशैली एवढी चांगली अन्ही. रात्री उशिरा झोपणे, लवकर उठणे आणि ऑफिसला जाणे अशी दिनचर्या अनेकांची झाली आहे. दिवसभर तिथे काम करून मग रात्री उशिरापर्यंत ते टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपमध्ये मग्न असतात. फक्त ४-५ तासांची झोप घेतली जाते. या सर्व सवयी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आजारी तर बनवतातच पण किडनीच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात. जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही दररोज ७-८ तासांची चांगली झोप घेतली पाहिजे.
(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या)
बराच वेळ लघवी रोखून ठेवणे
काही लोक जबरदस्तीने लघवी रोखून ठेवतात. लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. युरिन इन्फेक्शन, ब्लॅडर इन्फेक्शन किंवा गंभीर प्रकरणांमध्ये किडनी इन्फेक्शन होण्याची शक्यताही वाढते.
पाणी कमी पिणे
किडनी निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ विशेषतः पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील मदत करते. दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्यायल्याने एकूणच आरोग्यासाठी फायदा होतो.
(हे ही वाचा: स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यास करू शकते मदत; जाणून घ्या या फळाचे फायदे)
प्रोसेस्ड फूड खाणे
आजकाल लोकांकडे फारसा वेळ नसतो. ते घाईघाईने सर्वकाही करतात. अशा परिस्थितीत त्यांनी केटरिंगमध्ये अधिकाधिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सोडियम, फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी खराब होते.
मद्यपान आणि धूम्रपान करणे
जर तुम्ही मद्यपान आणि धूम्रपान करत असाल तर तुमच्या या सवयीमुळे यकृत तसेच किडनीलाही हानी पोहोचू शकते. धुम्रपान, मद्यपान हे आरोग्यास अपायकारक आहे, हे सर्वांना माहीत आहे. धुम्रपानामुळे लघवीतील प्रथिनांचे प्रमाण वाढते, जे किडनीसाठी चांगले नाही.
पेनकिलरचे अधिक सेवन
अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी असे झाले नाही की काही लोक पेनकिलर घेतात. अर्थात, वेदनाशामक औषधे तुम्हाला वेदना कमी करतात, परंतु त्यांच्या सतत वापरामुळे मूत्रपिंडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही औषधे मूत्रपिंड किंवा शरीराच्या कोणत्याही भागासाठी हानिकारक असतात. तुम्हाला आधीच किडनीशी संबंधित समस्या असल्यास, शारीरिक वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पेनकिलर घ्या.
(हे ही वाचा: Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला संसर्गापासून वाचवतो तुळशीचा पॅक; जाणून घ्या कृती)
मीठाचे जास्तप्रमाणत सेवन
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या तर वाढू शकतेच पण त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. जास्त प्रमाणात सोडियम घेतल्याने रक्तदाबावर परिणाम होतो, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढतो. माफक प्रमाणात मीठ वापरा.
जास्त गोड खाणे
आहारात गोड पदार्थांचा समावेश असेल तर ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. यासोबतच वजन वाढणे, उच्च रक्तदाब यामुळे किडनीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान होऊ शकते. जास्त साखर खाल्ल्याने लघवीतील प्रथिनांचे प्रमाण वाढते, जे किडनीसाठी चांगले नसते.
आहारातील पौष्टिक पदार्थांची कमतरता
निरोगी राहण्यासाठी, निरोगी आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक असतात. आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही किडनीवर परिणाम होऊ शकतो. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ च्या कमतरतेमुळे किडनी स्टोनची शक्यता वाढते.
(हे ही वाचा: Skin Care Tips: टॅनिंगने त्रस्त आहात? तर ‘या’ ३ टिप्स करा फॉलो)
जास्त मांसाहारी पदार्थ खाणे
प्राण्यांच्या प्रथिनांमुळे रक्तातील ऍसिडचे प्रमाण वाढते जे किडनीसाठी हानिकारक आहे. यामुळे ऍसिडोसिस होऊ शकतो. ऍसिडोसिस अशी स्थिती आहे ज्यामध्ये मूत्रपिंड पुरेसे जलद ऍसिड काढून टाकण्यास सक्षम नसते.
(किडनीचा आजार टाळण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी, डॉक्टरांचा सल्ला घ्या)