World Liver Day 2023: दरवर्षी १९ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड लिव्हर डे’ म्हणजेच ‘जागतिक यकृत दिन’ साजरा केला जातो. मेंदूनंतर, यकृत हा मानवी शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे. पचनक्रिया पूर्ण होणे, रोग प्रतिकारकशक्ती वाढत जाणे तसेच शरीरामध्ये पोषक द्रव्ये साठवणे अशी अनेक कामे यकृत म्हणजे लिव्हरद्वारे पूर्ण होत असतात. हा अवयव शरीरासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. खराब जीवनशैली, आहारामध्ये फास्ट फूडचे अतिप्रमाण यामुळे यकृताला इजा होण्याची शक्यता असतो. धुम्रपान व मद्यपान केल्यानेही लिव्हर खराब होते. डाएटमध्ये सुधारणा केल्याने यकृत निरोगी राहते. यासाठी दैनंदिन आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करावा लागतो.

ग्रीन टी (Green tea)

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. याच्या सेवनामुळे यकृताला इजा होत नाही. यकृताला सूज आल्यास ती कमी करण्यासाठी आणि या अवयवाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

कॉफी (Coffee)

कॉफीच्या सेवनामुळे यकृताला होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी होते असे एका अभ्यासामार्फत निदर्शनास आले आहे. यामध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे यकृताचे आजारापासून संरक्षण होते.

कोबी (cabbage)

कोबीसारख्या भाज्यांमध्येही अँटीऑक्सिडंट गुण असतात. आहारामध्ये कोबीचा समावेश केल्याने यकृत निरोगी राहते.

अ‍ॅव्होकॅडो (Avocados)

अ‍ॅव्होकॅडोमध्ये अँटीऑक्सिडंट्ससह हेल्दी फॅट्स देखील असतात. यामुळे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यातील फायबरमुळे पोटामध्ये होणारी जळजळ थांबते.

आणखी वाचा – मधुमेहामुळे यकृताला इजा होऊ शकते का? डायबिटीज असताना लिव्हरची कशी काळजी घ्यावी?

सुका मेवा (Nuts and seeds)

सुका मेवा खाल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स असे काही आवश्यक घटक असतात. या घटकांमुळे यकृताशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.

लसूण (Garlic)

लसूण हा पदार्थ खूप आरोग्यदायी असतो. म्हणूनच आहारामध्ये लसणाचा समावेश असणे आवश्यक असते. लसणामुळे यकृत व्यवस्थितपणे काम करण्यास सक्षम राहते.

आणखी वाचा – यकृताच्या विविध आजारांचा धोका; लाइफस्टाइलसह आहारात लगेच करा ‘हे’ १२ बदल

(टीप – आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते. असे केल्याने भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येतात.)

Story img Loader