शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे यकृत देखील एक महत्वाचा अवयव आहे. आपले आरोग्य निरोगी ठेवण्यात यकृत महत्वाची भूमिका बजावते. म्हणून त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जात आहे.

आपण नेहमीच आरोग्याच्या छोट्या-मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतो, कधीकधी आपल्याला नकळत किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे यकृतावर गंभीर परिणाम दिसू शकतात. यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणते बदल केले पाहिजेत आणि लाइफस्टाइलमध्ये काय बदल केले पाहिजे जाणून घेऊ…

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

आपण जे काही सेवन करतो, मग ते अन्न असो, अल्कोहोल असो किंवा इतर काहीही असो, शरीरात निर्माण होणारे विष आणि आतड्यांद्वारे शोषलेले हानिकारक पदार्थ हाताळण्यासाठी यकृत मुख्यतः जबाबदार असते. १९ एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन म्हणून यकृताशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो, यकृताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही जीवनशैलीत कोणते बदल करू शकता.

यकृताची प्रकृती सांभाळा!

यकृत निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

१) जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करु नका. यामुळे यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ शकते आणि सिरोसिसमध्ये सूज येऊ शकते, जी घातक ठरू शकते.

२) सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा, यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (NAFLD) टाळण्यास मदत होऊ शकते.

३) औषधांचे कधीकधी दुष्परिणाम होऊ शकतात, एसिटामिनोफेन किंवा सल्फा सारख्या वेदनाशामक औषधांमुळे यकृताच्या अनेक समस्या निर्माण होतात.

४) व्हायरल हेपेटायटीस हा एक गंभीर आजार आहे, ज्यामुळे यकृताचे नुकसान होते. हिपॅटायटीस ए हा आजार दूषित पाणी प्यायल्याने आणि अन्न खाल्ल्याने होऊ शकतो. जर हा रोग एखाद्या देशात पसरला असेल आणि तुम्हाला तिथे प्रवास करावा लागला तर तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करू शकता.

५) हिपॅटायटीस बी आणि सी रक्त आणि शरीरातील द्रवांद्वारे पसरतात. तुमचा धोका कमी करण्यासाठी टूथब्रश, रेझर किंवा सुया यांसारख्या गोष्टी शेअर करू नका. सेक्स दरम्यान प्रोटेक्शन वापरा.

६) हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी साठी लस उपलब्ध आहेत, त्यामुळे लसीकरण करा.

७) जास्त ताण यकृतासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तणावापासून दूर राहा आणि आराम करण्यासाठी वेळ काढा. प्रवास करण्यापासून ते झुंबा क्लासेस घेण्यापर्यंत किंवा कोणताही तुमच्या आवडीचा छंद जोपासा.

८) हाय कॅलरी असलेले पदार्थ, सॅच्युरेटेड फॅट, पाश्चराइज्ड कार्बोहायड्रेट (जसे की पांढरा ब्रेड, पांढरा भात आणि पास्ता) आणि साखर खाणे टाळा.

९) कच्चे किंवा कमी शिजलेले मासे खाऊ नका. निरोगी आणि संतुलित आहारासाठी, फायबरयुक्त आहार खा. तुम्ही ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि तांदूळ देखील खाऊ शकता. मांस, दुग्धजन्य पदार्थ (कमी चरबीयुक्त दूध आणि चीज माफक प्रमाणात) आणि हेल्दी फॅट (ज्या मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड आहेत, जसे की वनस्पती तेले, नट, बिया आणि मासे) सेवन करा.

१०) साफ-सफाईसाठी वापरली जाणारी स्वच्छता उत्पादने आणि कीटकनाशकांमध्ये रसायने असतात ज्याच्या थेट संपर्काद्वारे आल्याने यकृताला हानी पोहचू शकते. त्यामुळे सावधगिरीने वापरा.

११) सिगारेटचे सेवन फुफ्फुसासह यकृतासाठी हानिकारक आहे. त्यामुळे धूम्रपान टाळा.

१२) यासोबत सर्वात महत्वाचे म्हणजे शरीर हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचे आहे, म्हणून भरपूर पाणी प्या.

Story img Loader