World Mental Health Day 2023: जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक पातळीवर साजरा केला जातो. मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, मानसिक आरोग्याबाबत लोकांना शिक्षित आणि जागरुक करणे आणि त्यासाठी आवश्यक धोरणांना समर्थन करणे हे हा दिवस साजरा करण्यामागचे उदिष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जागतिक मानसिक आरोग्य दिन हा जागरुकता निर्माण करण्यासाठी ओळखला जाणारा दिवस आहे. विविध माध्यमांवर मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जागरुकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याच्या समस्या असणे म्हणजे कोणताही कलंक नाही हे पटवून देणे आणि मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या दिवशी केले जाता. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला, मानसिक आरोग्य आणि त्याचा लोकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि मदतीसाठी उपलब्ध साधनांबाबत शिक्षित करणे हे यामागील ध्येय आहे

मानसिक आरोग्यासंबंधित अडचणी दूर करणे, मानसिक आरोग्याबाबत जागरुक आणि संवेदनशील समाज निर्माण करणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे आवश्यक लक्ष आणि महत्त्व दिले जावे हे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे उदिष्ट आहे. आपण सामना करत असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जास्तीत जास्त संवाद साधणे हादेखील हा दिवस साजरा करण्याचा एक मार्ग आहे. मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे नैराश्य.

नैराश्य हा एक मानसिक आरोग्याचा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला सातत्याने दुःखी असल्याची भावना जाणवते. आपली कोणालाही गरज नाही असे वाटते, जगण्यासाठी किंवा कोणतेही काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही आणि आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यात रस नाही असे वाटते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रोजच्या जीवनातील सामान्य गोष्टी करण्यासाठी अडथळा येऊ शकतो आणि विविध प्रकारची शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसू शकतात. नैराश्याच्या सुरुवातीच्या काळात ही लक्षणे दिसू लागतात आणि ती कशी ओळखावी हे जाणून घेऊ या.

नैराश्याची लक्षणे कशी ओळखावी?

१. सतत दुःखी असल्यासारखे वाटणे –
नैराश्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मूड सतत खराब असू शकतो किंवा एखाद्याला अस्वस्थता जाणवू शकते. ही लक्षणे काही आठवडा किंवा काही महिने राहू शकते.

२. कोणत्याही गोष्टी करण्यासाठी आनंद किंवा उत्साह जाणवत नाही.
एखाद्या व्यक्तीला नैराश्य आल्यास त्याला कोणत्याही गोष्टी करण्यासाठी उत्साह जाणवत नाही किंवा आनंद मिळत नाही. जसे की छंद जोपासणे, लोकांसह संवाद साधणे आणि काही सामान्य गोष्टी इ. करण्याची इच्छा होत नाही.

हेही वाचा – ‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही

३. भूक लागणे आणि वजन यामध्ये बदल होऊ शकतो.
नैराश्यामुळे एखाद्याला भूक लागण्यामध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, कोणतेही डायटिंग न करता एखाद्याचे वजन कमी होऊ शकते किंवा जास्तीचे न खाताही वजन वाढू शकते.

४. झोपेमध्ये अडथळा निर्माण होणे.
झोपेमध्ये समस्या निर्माण होणे ही नैराश्यात सामान्य गोष्ट आहे. पण, एखाद्याला निद्रानाश (झोप न लागणे, जागे राहणे) किंवा हायपरसोमेनिया (hypersomnia) खूप जास्त झोप येणे अशा समस्या जाणवू शकतात.

५. खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.
रात्रभर झोपल्यानंतरही सतत थकवा आल्यासारखे जाणवणे, ऊर्जा नसल्यासारखे जाणवणे आणि ताकद नसल्यासारखे वाटणे हे नैराश्याचे लक्षण आहे.

हेही वाचा – ‘एचडीएल’ किंवा ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ कसे वाढवायचे? डॉक्टरांकडून जाणून घ्या सोपे उपाय

६. लक्ष केंद्रित करण्यात समस्या.
नैराश्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लक्ष केंद्रित करण्यात अडथळा येतो, निर्णय घेता येत नाही, गोष्टी अथवा माहिती लक्षात राहत नाही किंवा आठवत नाही. आपल्या वैयक्तिक अथवा शैक्षणिक कामगिरीवर खूप परिणाम होतो.

७. अपराधीपणाची भावना जाणवणे, आपली गरज नसल्यासारखे वाटणे किंवा आशा-अपेक्षा नसणे.
नैराश्य असलेल्या व्यक्तीला सतत नकारात्मक विचार येत असतात, सतत अपराधीपणाची भावना जाणवते किंवा आपली कोणालाही गरज नाही असे वाटते किंवा भविष्याबाबत कोणतीही आशा-अपेक्षा जाणवत नाही.

८. सतत चिडचिड होणे किंवा अत्यंत राग येणे.
नैराश्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत चिडचिड होत असल्याचे जाणवते आणि पटकन राग येतो किंवा राग अनावर होतो.

९. लोकांसह संवाद साधण्यात रस नसतो.
नैराश्य असलेल्या व्यक्ती स्वत:ला इतरांपासून दूर ठेवतात, लोकांशी संवाद साधणे टाळतात आणि कुटुंब, मित्र-मैत्रिणींसह संवाद कमी करतात.

१०. वारंवार आत्महत्येचे किंवा मृत्यूचे विचार येतात
सतत मृत्यू, आत्महत्येचे विचार करणे हे नैराश्याचे गंभीर लक्षण आहे आणि डॉक्टरांची मदत घेण्याची आवश्यकता आहे.

यापैकी काही लक्षणे जाणवत असल्यास नैराश्य असेल असे नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस येत असतात. पण, जर ही लक्षणे दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सातत्याने जाणवत असतील, तुमच्या दैनंदिन कार्यावर परिणाम होत असेल तर डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.