Tips To Quit Smoking: तंबाखू हा एक हानीकारक पदार्थ आहे. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगासारखे महाभयंकर आजार बळावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, तंबाखूमुळे दरवर्षी तब्बल ८० लाख लोकांचा मृत्यू होतो. या व्यसनाच्या दृष्परिणामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि आजारांविषयी जनजागृती व्हावी यासाठी दर वर्षी ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा केला जातो. धूम्रपानामुळे आपल्या शरीरात तंबाखू जात असतो. तंबाखूच्या सेवनाचे हे सर्वसामान्य माध्यम आहे. या व्यसनामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. तसेच श्वसनाशी संबंधित अन्य विकारदेखील उद्भवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तंबाखूमध्ये निकोटिन हा घटक असतो. निकोटिन शरीरामध्ये गेल्यावर मेंदूमध्ये डोपामाइन हा हॅप्पी हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात होते. यामुळे मूड चांगला होता. अनेकदा ताणतणाव असताना लोक सिगारेट ओढतात. अशा वेळी त्यांच्या मेंदूमध्ये डोपामाइनमुळे त्यांचा ताण दूर होतो. यामुळे धूम्रपान करण्याची सवय लागते. ही सवय सोडणे कठीण असते. पण निश्चय करून धूम्रपान करण्यावर नियंत्रण ठेवता येते.

धूम्रपान करण्याची सवय सोडण्यासाठीच्या टिप्स –

योग्य कारण शोधा आणि त्यावर ठाम राहा.

धूम्रपान न करण्यासाठी तुम्हाला एक कारण आवश्यक असते. ही गोष्ट खासगी असू शकते. उदा. मुलांसाठी म्हणून सिगारेट सोडणे किंवा शरीराला त्रास व्हायला सुरुवात झाली म्हणून धूम्रपान न करणे. हे कारण निश्चित केल्यावर या निर्णयावर ठाम राहा. सलग सवय सुटणार नाही. पण प्रयत्नांनी हळूहळू नक्की सुटेल.

Chewing gumsचा वापर करा.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला धूम्रपान करायची सवय लागते. तेव्हा त्याला तोंडामध्ये सतत काहीतरी ठेवायची सवय लागते. या सवयीमुळेही सिगारेट पिण्याची इच्छा निर्माण होते. हे घडू नये यासाठी Chewing gumsचा वापर करा. याने तुमचे तोंड आणि मेंदू व्यस्त राहील.

कामांमध्ये स्वत:ला गुंतवून घ्या.

धूम्रपान करण्याचा विचार मनात येऊ नये यासाठी स्वत:ला विविध गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सिगारेट ओढण्याबद्दल विचार करायची संधीच मिळणार नाही.

आणखी वाचा – No-Tobacco Day: धूम्रपान करण्याची सवय लवकर का सुटत नाही? तंबाखूमधील कोणत्या घटकामुळे व्यसनाची सवय लागते?

भरपूर पाणी प्या.

जेव्हा नियमितपणे धूम्रपान करणारी व्यक्ती ही सवय मोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास पाण्याची मदत होते. यासाठी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते.

व्यायाम करायला सुरुवात करा.

शरीरातील निकोटिन कमी व्हावे यासाठी व्यायामाची मदत होऊ शकते. काही वेळेस धूम्रपान न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मध्येच सिगारेट ओढण्याची इच्छा मनात निर्माण होते, अशा वेळी व्यायामामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येते. अशा वेळी चालायला जावे, जॉगिंग करावे.

मद्यपान करणे टाळा.

काहींना मद्यपान करताना सिगारेट ओढण्याची सवय असते. मद्यपान करताना धूम्रपान न करणे अशा लोकांसाठी कठीण असते. धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी मद्यपानावरदेखील नियंत्रण ठेवावे लागेल. मद्यपानाव्यतिरिक्त कॉफी पिणे, तंबाखू खाणे अशा व्यसनांमुळेही धूम्रपान करण्याची इच्छा बळावू शकते. या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केल्याने धूम्रपान करण्यावर मर्यादा येतात.

आणखी वाचा – Health special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात? कसे ओळखणार?

सतत प्रयत्न करत राहा.

धूम्रपान करण्याचे दुष्परिणाम ठाऊक असल्याने बरेचसे लोक ही सवय सोडण्याचा प्रयत्न करतात. पण फार कमी लोकांच्या प्रयत्नांना यश मिळते. त्यामुळे धूम्रपान करण्याच्या सवयीविरुद्ध सतत लढत राहा, कधीही हार मानू नका. तुमची ही सवय नक्की सुटेल.

(ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारलेली आहे.)