दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी अवयव दानाचे महत्त्व संबोधित करण्यासाठी आणि अवयव दान करण्याशी संबंधित मिथकांना दूर करण्यासाठी ‘जागतिक अवयव दान दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून अधिक जीव वाचतील. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचू शकतात. निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे असंख्य लोक आपले प्राण गमावतात जे अवयव दानामुळे वाचू शकतात. या दिवसाचे उद्दीष्ट लोकांना हे समजण्यास मदत करणे आहे की मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यासाठी स्वयंसेवा करणे अनेकांसाठी जीवन बदलणारे असू शकते.

पहिले अवयव दान आणि नोबेल पारितोषिक

आधुनिक औषधाने लक्षणीय विकास केला आहे आणि यामुळे अवयव एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे तसेच निरोगी जीवन जगण्यास सक्षम केले आहे. पहिले यशस्वी जिवंत दाता अवयव प्रत्यारोपण अमेरिकेत १९५४ मध्ये करण्यात आले. रोनाल्ड आणि रिचर्ड हेरिक या जुळ्या भावांमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल डॉक्टर जोसेफ मरे यांना १९९० मध्ये शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Amrut Snan on Vasant Panchami
Mahakumbh Mela 2025 : मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीनंतर वसंत पंचमीसाठी उत्तर प्रदेश सरकारची चोख व्यवस्था; ‘एवढ्या’ कोटी भाविकांचं अमृतस्नान!
Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Shivendra Singh Raje, Guardian Minister ,
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागताला ‘उदयनराजे मित्र समूह’
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Ajit Pawar says he is considering raising the age of juvenile offenders to 14 years Pune print news
अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे विचाराधीन; अजित पवार यांची माहिती
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य

कोण अवयव दाता म्हणून स्वयंसेवक होऊ शकतो?

एखाद्याने अवयव दान करणे हे समोरच्या व्यक्तीसाठी नवीन जीवन ठरतं. कोणीही वय, जात आणि धर्म विचारात न घेता अवयव दाता म्हणून स्वयंसेवक होऊ शकतो. तथापि, हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे की जे लोक त्यांचे अवयव दान करण्यासाठी स्वयंसेवा करतात त्यांना एचआयव्ही, कर्करोग किंवा हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांसारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त नाही. दाता निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर कोणीही दाता म्हणून नोंदणी करू शकतो.

अवयव दानाचे प्रकार

अवयव दानाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे जिवंत असतांना आणि दुसरा म्हणजे मृत झाल्यानंतर.  जिवंत असतांना मूत्रपिंड आणि यकृताचा एक भाग यांसारखे अवयव दान करू शकतात. मनुष्य एका किडनीवर जगू शकतो आणि यकृत हा शरीरातील एकमेव अवयव आहे जो स्वतःला पुनर्जन्म देण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे दाता जिवंत असताना या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य होते. अवयव दानाचे दुसरे रूप शवदान म्हणून ओळखले जाते. या प्रक्रियेमध्ये, दात्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचे निरोगी अवयव जिवंत व्यक्तीला प्रत्यारोपित केले जातात.

भारताचा स्वतःचा अवयव दान दिवस आहे जो दरवर्षी २७ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी सरकार भारतीय नागरिकांना स्वेच्छेने त्यांचे अवयव दान करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी प्रोत्साहित करते.

 

Story img Loader