History and Significance of World Smile Day : आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण ताण-तणावात असतो. अशावेळी एक स्मितहास्य एखाद्याचा सर्व ताण कमी करते. असे म्हणतात की, एक स्मितहास्य एखाद्या व्यक्तीचा दिवस चांगला बनवू शकते. हसण्याचे अनेक फायदे आहेत, म्हणूनच नेहमी हसा आणि हसवत राहा असे सांगितले जाते. हास्य ही मौल्यवान भेट आहे, जी आपण एक पैसा खर्च न करता कोणालाही देऊ शकतो.

कधी साजरा केला जातो World Smile Day ? जाणून घ्या इतिहास.

तुम्हाला माहीत आहे का की, दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक स्मितहास्य दिवस म्हणजेच वर्ल्ड स्माइल डे साजरा केला जातो. १९६३ मध्ये वॉर्सेस्टरच्या मँसाचुसेट्स (Massachuset) येथील एका व्यावसायिक ग्राफिक्स आर्टिस्ट हार्वे बॉल याने एका ग्राहकाचे काम करताना स्माईली फेसचा इमोजी तयार केला होता. १९९९ मध्ये त्याने ‘वर्ल्ड स्माइल डे’ साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांना नेहमी हसत राहण्यासाठी प्रेरणा देणे हा या दिवस साजरा करण्यामागील उद्देश्य आहे. यंदा हा दिवस ७ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – नाश्ता किंवा जेवणाची योग्य वेळ कोणती? वजन कमी करण्यासाठी काय करावे?

World Smile Day : महत्व

मनापासून जर तुम्ही स्मितहास्य केले तर तुम्हाला स्वत:ला सकारात्मकता जाणवेलच, पण तुमच्या आसपासचे वातावरणही प्रसन्न राहील. एक स्मित हास्य नात्यातील ताण-तणाव कमी करू शकते, कारण त्यामुळे नात्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते. संस्कृती, भाषेसारख्या मर्यादा ओलांडून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद साधण्यासाठी उत्तम सुरुवात एका स्मितहास्याने करता येते. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते आणि जेव्हा दु:खी असतो तेव्हा हेच स्मितहास्य आपल्याला आधार आणि धीर देते.

हेही वाचा – International Music Day 2023: आंतरराष्ट्रीय संगीत दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

एक साधे हास्य एखाद्यामध्ये सकारात्मकता आणि दयाळूपणा निर्माण करू शकते, हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवणे हा World Smile Day साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. World Smile Day दिवशी तुम्ही इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा दिवस चांगला जाण्यासाठी एक स्मितहास्य करू शकता. तुमच्या मित्र-मैत्रिणींसाठी, कुटुंबासाठी आणि अनोळखी व्यक्तींसाठी एक स्मितहास्य करा आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. सुंदर फोटो, विचार आणि शुभेच्छा देऊन सकारात्मकता निर्माण करा.

Story img Loader