Tips to Protect and Save Birds : काही वर्षांपूर्वी घराच्या अंगणात, खिडक्यांवर, दिवस उजाडताना आणि सूर्य मावळताना आपल्या कानांवर पक्षांचा किलबिलाट आणि असंख्य चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत असे. मात्र, वाढते ध्वनी-हवा प्रदूषण, बांधकामं, तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, वाढती लोकसंख्या यांसारख्या गंभीर कारणांमुळे चिमण्यांचा चिवचिवाट आता आपल्या कानांवर पडत नाही. या सर्व गोष्टींमुळे चिमण्यांसारख्या इतर पक्षांच्या संख्येवरदेखील चांगलाच परिणाम झालेला आहे. म्हणूनच चिमण्यांच्या, इतर पक्षांच्या संवर्धनासाठी दरवर्षी २० मार्च रोजी ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा केला जातो.
या चिमण्यांची संख्या कमी होण्यामागे नेमके आणि सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढल्याने पर्यावरणाशी संबंधित या तीन समस्या अधिक जाणवू लागल्या.
हेही वाचा : World Wildlife Day 2024 : भारतातील धोक्यात असलेले पाच वन्यप्राणी कोणते? घ्या जाणून….
१. जंगलतोड
मनुष्याला वस्ती आणि प्रवासाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगले तोडली गेली.
२. प्रदूषण
मनुष्यवस्ती वाढल्याने आपसूकच ध्वनी – वायू – जल प्रदूषणाची पातळी वाढू लागली.
३. इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन
मनुष्याने लावलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या, खास करून मोबाइलच्या शोधामुळे, त्यामधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनचा परिणाम पर्यावरणात मुक्तपणे वावर करणाऱ्या पक्षांवर होऊ लागला.
या तीन मुख्य कारणांमुळे आज आपल्याला चिमण्यांची संख्या प्रचंड कमी झालेली दिसत आहे. आपल्याला ही कारणे वर्षानुवर्षे माहीत आहेत. मात्र, इतर पक्षांना वाचवण्यासाठी तसेच ज्या चिमण्या उरल्या आहेत, त्यांचे संवर्धन करण्यासाठी यावर उपाय काय करायचा? पाहूया.
चिमण्यांचे आणि इतर पक्षांचे संरक्षण कसे करावे?
आपण सध्याच्या वाढत्या प्रदूषणावर किंवा इतर गोष्टींवर एका दिवसात उपाय, तोडगा शोधून काढू शकत नाही. मात्र, आपल्या घरातून जर अगदी लहानातली लहान मदत जरी या पक्षांना केली तरी त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर…
हेही वाचा : जगातल्या सर्वात मोठ्या फुलाला येतो ‘सडक्या मांसाचा’ वास! काय आहे याचे नाव, जाणून घ्या
१. बर्ड फीडर लावणे
जंगलांचे कमी होत जाणारे प्रमाण आणि काँक्रीटच्या जंगलांची वाढती संख्या लक्षात घेता, पक्षांच्या खाद्याची सोय आपण करू शकतो. यासाठी घराच्या बाल्कनीत, खिडकीत बर्ड फीडर लावून घेऊ शकतो किंवा एखाद्या डब्यात पक्षांसाठी खाऊ काढून ठेऊ शकतो. या फीडरमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी यांसारखी धान्य घालून ठेवा.
२. पाण्याची सोय
जसा उष्णतेचा आणि तीव्र उन्हाचा त्रास आपल्याला होतो, तसाच तो पक्षांनासुद्धा होत असतो. तेव्हा बर्ड फीडरच्या बरोबरीनेच पाण्याने भरलेले भांडे अवश्य खिडकीमध्ये ठेवा.
३. झाडे लावा
तुम्हाला जमतील तशी, जमतील तिथे आणि जमतील ती झाडे लावण्याचा एक संकल्प करा. झाडं लावण्याचा फायदा केवळ चिमण्यांना किंवा पक्षांना घरटी बनवण्यासाठी नसून, याचा अधिक फायदा हा भविष्यात आपल्यालाच होणार आहे. तुम्ही लावलेल्या झाडांमुळेच प्रत्येक सजीवाला शुद्ध हवा आणि मुबलक प्राणवायू मिळू शकतो.
४. औषधांची अति फवारणी नको
तुम्ही जर शेती किंवा बागकाम करणारे असाल तर बागेमध्ये किंवा शेतातील पिकांवर अति प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करू नका.
हे चार अतिशय साधे, सोपे मात्र तितकेच उपयुक्त असे उपाय आहेत; ज्यांच्या मदतीने आपण पक्षांना किमान संरक्षण देऊ शकतो.
चिमण्या-पक्षांचे प्रमाण का कमी होत आहे हे पाहिले; त्यावर उपायसुद्धा बघितले. आता जागतिक चिमणी दिनानिमित्त, चिमण्यांबद्दल काही मजेशीर गोष्टीसुद्धा जाणून घेऊ.
खरंतर चिमणी या पक्षाला मनुष्य वस्तीबरोबर राहणे, मानवांच्या सानिध्यात राहायला आवडते. जिथे मनुष्यवस्ती अधिक तिथेच चिमण्यांचे प्रमाणसुद्धा अधिक असल्याची माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
चिमण्यांचे खाद्य – तांदूळ, धान्य, अळी विशेषतः डासांच्या अळ्या, किडे इत्यादी गोष्टी चिमणीला पसंत आहेत.
चला तर मग, अशा पद्धतीने यंदाच्या ‘जागतिक चिमणी दिनापासून’ आपल्या लाडक्या चिऊताईचे संवर्धन आणि इतर पक्षांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करू.