जगातील पहिली मलेरियाविरोधी लस येत्या दोन वर्षांत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या लसीची रुग्णांवर मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली. चाचणीचे निकाल सकारात्मक आल्यामुळे ही लस दोन वर्षांमध्ये बाजारात उपलब्ध होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आफ्रिकेतील मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे तेथील मुलांना मलेरिया होण्याचे प्रमाण घटल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. इंग्लंडमधील औषध निर्मितीतील प्रसिद्ध कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइनने या लसीची निर्मिती केलीये. कंपनीने तयार केलेली लस घेतल्यानंतर तरुणांना आणि बालकांना सुमारे १८ महिन्यांपर्यंत मलेरिया होण्यापासून वाचविले जाऊ शकते, असे चाचण्यांमध्ये आढळले. या माहितीच्या आधारावरच कंपनी आता नियामक मंडळाकडे लसीच्या विक्रीला मंजुरी देण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील ही लस २०१५ पर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा