मैदा, बेसन आणि रवा आणि पीठाचा वापर प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या घरी होतो. नाष्ट्यात भजी बनवायची असेल किंवा जेवणात पोळी. मुलांसाठी शिरा किंवा पाहुण्यासाठी पुरी. भारतीय लोक प्रत्येक गोष्टीचा वापर करत एक वेगळा पदार्थ बनवतात. आता स्वयंपाक घरात असलेल्या या सगळ्या गोष्टी नीट राहणं किंवा नीट ठेवणं पण तितकचं गरजेचं आहे. कधी कधी पावसाळा सुरु होण्याच्या आधीच यांना कीडं लागते. जर तुम्ही पण बेसन, रवा आणि पीठाला कीडं लागण्याच्या समस्येला त्रासले आहात. तर पुढ देण्यात आलेल्या टिप्स या नक्कीच वाचा
१. तेजपान किंवा लिंबाची पानं
तेज पान किंवा लिंबाच्या झाडाचं पानं हे रवा, मैदा किंवा बेसनच्या डब्यात ठेवल्यास कीडं लागतं नाही. यामुळे फक्त कीटकांपासून संरक्षणच होते असे नाही तर आर्द्रतेपासून देखील संरक्षण होते.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार
२. हवा बंद डब्बे
मैदा, बेसन, रवा आणि पीठाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी त्याना काचेच्या, धातूच्या किंवा कोणत्याही चांगल्या किंवा जाड प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. यामुळे कीडं लागणार नाही आणि ओलावाही लागणार नाही.
३. रेफ्रिजरेटिंग
जर तुम्हाला रवा, मैदा आणि बेसन जास्त काळ ठेवायचे असेल तर तुम्ही त्यांना फ्रीजमध्ये ठेवू शकता. या सर्व गोष्टी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून, ते बर्याच काळ ताजे राहतात आणि त्याला कीडंसुद्धा लागत नाही.
आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन
४. पुदिन्याची पानं
रवा आणि बेसनला कीडं लागू नये म्हणून पुदीन्याची कोरडी पानं ही त्यात ठेवा. पुदीन्याच्या वासामुळे त्यात कीडं लागणार नाही.