शाओमी कंपनीने आपला नवा स्मार्ट फिटनेस बॅंड भारतात लॉंच केला आहे. शाओमीने त्यांचा एमआय स्मार्ट बॅंड ६ (Mi Smart Band 6) हा स्मार्ट बॅंड भारतीय बाजारात आणला आहे. यावेळी शओमी कंपनीतर्फे भारतात स्मार्ट लिव्हिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या इव्हेंट दरम्यान Xiaomi Mi Smart Band 6 या बॅंडसह एकूण ६ नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्ट फिटनेस बॅंडची किंमत आणि फीचर्स.
Mi Smart Band 6 ची किंमत
येत्या ३० ऑगस्टपासून भारतात हा बॅंड विक्रीसाठी सुरू होणार आहे. यावेळी शाओमीच्या वेबसाइट आणि ऑफलाईन Amazon इंडिया, एमआय होमसह ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून ग्राहकांना हा स्मार्ट फिटनेस बॅंड खरेदी करता येणार आहे. आता हा एमआय स्मार्ट बॅंड ६ या बॅंडची किंमत ३,४९९ रुपये आहे. हा बॅंड कमी किंमतीत भन्नाट फीचर्स देतो. तसेच हा स्मार्ट बँड यलो, ब्लॅक, ब्लू, ऑरेंज, ऑलिव्ह आणि आयव्हरी कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
Mi Smart Band 6 ची फीचर्स
शाओमी कंपनीकडून सांगण्यात आले की तुम्ही जर एमआय बँड १ ते एमआय बँड ५(Mi Band 1, Mi Band 5) पर्यंतच्या वापरकर्त्यांनी एमआय बँड ६ (Mi Band 6) खरेदी केल्यास त्यांना ५०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तुम्हाला एमआय बँड ६ यामध्ये १.५६ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याची ब्राइटनेस ४५० नीटस (nits) आहे. या स्मार्ट बॅंडमध्ये ८० कस्टमाईज करण्यायोग्य वॉच फेसेस आहेत. Mi Band 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटरसुद्धा देण्यात आला आहे. याशिवाय या बॅंडमध्ये रक्ताचा ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर देखील देण्यात आला आहे, ज्याला एसपीओ २ असेही म्हणतात.
या फिटनेस बँडची स्क्रीन मागील आवृत्तीपेक्षा ५० % अधिक आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक कस्टमाईज पर्याय देण्यात आले आहेत. एमआय स्मार्ट बँड ६ मध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि डोळ्यांची जलद हालचाल सारखी फीचर्स असून यात स्ट्रेस मॉनिटर फीचर्ससह खोल श्वास मार्गदर्शन देखील दिले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा स्मार्ट वॉच १४ दिवसांची बॅटरी लाईफ देईल. हा फिटनेस बँड 5ATM पाणी प्रतिरोधक आहे.
Mi Band 6 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्ट बॅंड अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही स्मार्टफोनला कनेक्ट केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला प्ले स्टोर (Play Store) किंवा अॅप स्टोर (App Store) वरून एमआय फिट अॅप ( Mi Fit App) डाउनलोड करावे लागेल. यावेळी कंपनीने वेगळ्या प्रकारचे चार्जर देखील दिले आहे. मागच्या वेळेप्रमाणे या वेळी डॉक सिस्टीम नाही, पण काही पिन आहेत. जे, अगदी सुलभ आणि वापरण्यास अतिशय सोपे आहेत.