झिओमीने आपल्या ‘एमआय ए वन’ स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. १४ हजार ९९९ रुपयांना असणारा हा फोन आता ग्राहकांना १२ हजार ९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे. पण ही खास ऑफर तीन दिवसांसाठी देण्यात आली आहे. ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटबरोबरच फ्लिपकार्टवर या विशेष किंमतीमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘एमआय ए वन’ हा अॅण्ड्रॉइड ७.१.२. नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मात्र कंपनीने अॅण्ड्रॉइड ८.० म्हणजेच अॅण्ड्रॉइड ओरियओची मोफत अपडेट दिली आहे. या फोनला फूल एचडी ५.५ इंचांची २.५ डी गोरिला ग्लास प्रकारची स्क्रीन आहे. संपूर्ण स्टील बॉडी असणारा हा फोन आकर्षक दिसतो. हा फोन कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरवर काम करतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट मेमरी असणाऱ्या या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे.

या फोनमध्ये १२ मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा आहे. ही लेन्स १२ मेगापिक्सलची टेलिफोटो प्रकाराची लेन्स असून ती 2x ऑप्टिकल झूम करुन वापरता येऊ शकते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला असून फोनची बॅटरी ३०८० एमएएच इतक्या क्षमतेची आहे.