विविध ई-कॉमर्स वेबासाइटवरील ‘रिपब्लिक डे सेल’मध्ये जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला नसेल तर तुमच्याकडे अजून एक संधी आहे. कारण आजपासून फ्लिपकार्टवर शाओमीचा Mi Days सेल सुरू होत आहे. आजपासून म्हणजे 28 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान हा सेल सुरू असेल. जाणून घ्या कोणत्या सेलवर किती सूट –

Xiaomi Redmi Note 5 Pro-
Redmi Note 5 Pro च्या 4GB रॅम असलेल्या व्हेरिअंटवर 4 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 6GB रॅम असलेल्या व्हेरिअंटवरही 4 हजार रुपयांची सूट दिली जात असून 12 हजार 999 रुपयांमध्ये हा स्माप्टफोन उपलब्ध आहे.

Xiaomi Redmi Note 6 Pro –
या सेलमध्ये 4GB RAM + 64GB इंटरनल स्टोरेज असलेला रेडमी नोट-6 प्रो 3 हजार रुपयांच्या सवलतीसह 12 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर 17 हजार 999 रुपये किंमत असलेला (6GB RAM + 64GB) रेडमी नोट-6 प्रो देखील 3 हजार रुपयांच्या सवलतीसह 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Xiaomi Poco F1 – 
Mi Days सेलमध्ये पोको F1 या स्मार्टफोनवर तब्बल 5 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या फोनचं बेसिक मॉडेल (6GB RAM + 64GB) सवलतीसह 18 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 6GB RAM + 128GB इंटरनल स्टोरेज असलेलं व्हेरिअंट 21 हजार 999 रुपयांत आणि 8GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज असलेलं व्हेरिअंट 25 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Xiaomi Redmi 6 –
Mi Days सेलमध्ये रेडमी 6 या स्मार्टफोनवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचं 32GB व्हेरिअंट 7 हजार 499 रुपयांत आणि 64GB मॉडल 8 हजार 499 रुपयांत उपलब्ध आहे.

Story img Loader