एखादा सण किंवा कोणत्याही विशेष दिवसानिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांची जोरदार चढाओढ सुरु असते. भारतात नवरात्र, दिवाळी, ईद या सणांप्रमाणेच ख्रिसमसचा सणही देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिओमीने आता ख्रिसमसच्यानिमित्ताने खास सेल जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना शिओमीचे फोन अगदी कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर चुकवू नका. कपंनीच्या ऑफीशियल वेबसाईटवर www.mi.com ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
आज दुपारी १२ वाजता सुरु होणारा हा सेल २१ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाईल फोनबरोबरच पॉवर बँक आणि इतर मोबाईल अॅक्सेसरीज मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सेलमध्ये दुपारी २ वाजता असणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये ग्राहकांना केवळ १ रुपयात फोन खरेदी करता येणार आहे. यासाठी सहा उत्पादनांची निवड करण्यात आली असून त्यात Xiomi red mi 5 A, mi VR 2, Mi router 3 c , Red mi Y1 light, Mi WiFi reapeter, Mi band HRX या उत्पादनांचा समावेश आहे. शिओमीने भारतीय मोबाईल बाजारात अगदी कमी वेळात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर अशाप्रकारच्या विविध ऑफर्स दिल्याने कंपनीचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
Xiaomi Mi MIX 2 या फोनची किंमत ३५,९९९ असून तो ३२,९९९ रुपयांना मिळणार आहे. Xiaomi Mi Max 2 या फोनची मूळ किंमत १४,९९९ रुपये असून तो फोन १२,९९९ रुपयांना मिळणार आहे. Xiaomi Redmi 4 वर १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. Xiaomi Redmi Note 4 आणि Redmi Y1 Lite यावरही भरघोस सूट मिळणार आहे. फोनच्या कव्हरवर १०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. २० हजार मिलीअॅम्पियर्सच्या आणि १० हजार मिलीअॅम्पियर्सच्या पॉवर बँकवर ५०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. Mi Band HRX Edition Black १२९९ रुपयांना उपलब्ध आहे.