शाओमीने ‘नंबर 1 Mi फॅन सेल’चं आयोजन केलं आहे. उद्यापासून(दि.19) तीन दिवस म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर उपकरणांवर ऑफर आणि सूट मिळणार आहे. तसंच कंपनीने गुगल, मोबिक्विक आणि पेटीएमसह भागीदारी केली आहे. याअंतर्गत कॅशबॅक आणि इतर ऑफर्सचा लाभ घेता येईल.

या सेलमध्ये रेडमी 6 ए हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयामध्ये खरेदी करण्याची संधीही असणार आहे. मात्र, केवळ एकाच भाग्यवान ग्राहकाला एक रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. तर Redmi Y2 हा स्मार्टफोन 9 हजार 999 रुपयांऐवजी 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. लेटेस्ट स्मार्टफोन Mi A2 वर 1,000 रुपयांची सूट आहे. तसंच Redmi Note 5 Pro हा स्मार्टफोन ग्राहकांना 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय कॅशबॅकची ऑफरही आहे. रेडमी वाय 2, रेडमी नोट 6 प्रो, एमआय ए2, पोको एफ 1, रेडमी एफ 1, रेडमी 6, रेडमी 6ए, रेडमी 6 प्रो आणि रेडमी नोट 5 प्रो या स्मार्टफोनच्या खरेदीवर 300 रुपये कॅशबॅक मिळू शकतात.

स्मार्टफोनशिवाय शाओमीच्या Mi TV मॉडलवर मोठी सूट आहे. Mi TV 4A Pro 49 मॉडल 30,999 रुपयांमध्ये आणि 14 हजार 999 रुपयांमध्ये Mi TV 4C Pro 32 हा टीव्ही उपलब्ध आहे. तर Mi TV 4A 43 मॉडल सेलमध्ये 21, 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय ‘एमआय बॉडी कंपोसिशन स्केल’ 1 हजार 999 रुपयांऐवजी 1 हजार 799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय एक्सचेंज ऑफर आणि कुपन देखील सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Story img Loader