ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाओमी कंपनीने आपला नवा POCO स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. POCO Armoured Edition असं या स्मार्टफोनचं नाव असून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 23 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आलीये.
6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले (18.7:9 अॅस्पेक्ट रेशो )देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंसशी निगडीत अनेक फिचर्स देण्यात आलेत. यामध्ये Android 8.1 Oreo कस्टम सॉफ्टवेअर आहे. याशिवाय, फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसंच सेल्फीप्रेमींसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. 4000 mAh ची बॅटरी फोनमध्ये आहे.