शाओमीच्या Redmi 6A या स्मार्टफोनला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. आज या स्मार्टफोनसाठी शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर सेल आयोजित करण्यात आला होता. 12 वाजता हा सेल सुरू झाला आणि अवघ्या दोन मिनिटातच Sold Out हा मेसेज झळकला. सर्वप्रथम अवघ्या एका मिनिटातच 16 जीबी मेमरी आणि 5,999 रुपये किंमत असलेलं व्हेरिअंट आउट ऑफ स्टॉक झालं, त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला 32 जीबी स्टोरेज आणि 6,999 रुपये किंमत असलेलं व्हेरिअंट आउट ऑफ स्टॉक झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सेलमध्ये रेडमी 6ए च्या खरेदीवर अनेक ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या. रिलायन्स जिओच्या युजर्सना या फोनवर २२०० रुपयांची कॅशबॅक ऑफर होती. याबरोबरच १०० जीबी ४G जास्तीचा डेटा, ३ महिन्यांसाठी हंगामा म्युझिकचे मोफत सबस्क्रीप्शन आणि जुना फोन देऊन हा फोन खरेदी करण्याचीही ऑफर होती. तसंच Ixigo travel कडून या फोनवर 3 हजार 500 रुपयांचे कुपन दिले जात होते.

जाणून घेऊया रेडमी 6 ए बद्दल –
Redmi 6A च्या 16 जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत 5,999 रुपये आहे, तर 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये आहे. दोन्ही व्हेरिअंट्समध्ये 2 जीबी रॅम असून मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. आजच्या सेलमध्ये जिओ ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,200 रुपये कॅशबॅक आणि 100 जीबी जादा डेटा मोफत मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंच एचडी+ (720×1440 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. 13 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी VoLTE, ब्लूटूथ 4.2, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत. रेडमी 6ए मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. 3000 एमएएच बॅटरी असून रेडमी 6ए ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi redmi 6a sold out in just two minutes in sale
Show comments