शाओमी कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 6 Pro अखेर भारतात लाँच केला आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आणि याच्या किंमत व वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. याआधी बाजारपेठेत असणाऱ्या आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या Redmi Note 5 Pro या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. या फोनच्या पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला दोन अशाप्रकारे चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यापूर्वी थायलंड आणि इंडोनेशियात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाओमीने नव्या रेडमी नोट 6 प्रोच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये ठेवली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन 23 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर ‘ब्लॅक फ्रायडे सेल’मध्ये विशेष किंमतीत उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये 4 जीबी रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये असणार आहे. कंपनीने ब्लॅक फ्रायडे सेलसाठी HDFC बँकेशी भागीदारी केली आहे. याद्वारे 500 रुपयांची सूट मिळेल. शुक्रवारी एका विशेष सेलचं देखील आयोजन केले जाणार आहे. दुपारी 12 वाजेपासून स्मार्टफोनसाठी सेल सुरू होईल. एमआय स्टोअर्स आणि शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. रेड, ब्ल्यू, रोज गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. रिलायंस जिओसह केलेल्या भागीदारीअंतर्गत या फोनवर 2,400 रुपये कॅशबॅक आणि 6 टीबी अतिरिक्त 4जी डेटा मिळेल. याशिवाय या फोनसोबत कंपनीकडून एक ‘प्रोटेक्टिव केस’ मोफत दिली जाणार आहे.

Redmi Note 6 Pro हा फोन दिसायला जवळपास Note 5 Pro प्रमाणेच आहे. याच्या पुढील आणि मागील बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. म्हणजे एकूण चार कॅमेरे यात आहेत. सेल्फीसाठी असलेल्या दोन कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा 20 मेगापिक्सलचा तर दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. मागील बाजूला 12 आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये रेडमी नोट 5 प्रो प्रमाणेच 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 6 प्रो MIUI 10 वर आधारित अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.26 इंच आयपीएस एलसीडी फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे.