48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेल्या Redmi Note 7 ची आजपासून विक्री सुरू झालीये. चीनमध्ये या स्मार्टफोनसाठी आज पहिल्या सेलचं आयोजन करण्यात येणार आहे. नव्या Redmi मालिकेची सुरूवात Redmi Note 7 द्वारा झाली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये म्हणजे महिना संपेपर्यंत 10 लाख Redmi Note 7 ची विक्री होईल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये 10 जानेवारी रोजी हा स्मार्टफोन लाँच झाला होता. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स आणि पोट्रेट मोड आहे. हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. भारतातही हा स्मार्टफोन लवकरच लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 10 हजार 300 रुपये असू शकते. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 12 हजार 400 तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 14 हजार 500 रुपये असू शकते. .

तीन व्हेरिअंट्स-
Redmi Note 7 मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले असून यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन आहे. Redmi Note 7 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4,000mAh पावरची बॅटरी आहे. दीड दिवसांपर्यंत ही बॅटरी टीकेल असा कंपनीचा दावा आहे. यात Type-C USB चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. तसंच क्वॉलकॉम क्विक चार्ज 4.0 सपॉर्ट आणि हेडफोन जॅक आहे. फोनच्या मागील बाजूला ग्लास डिझाइन आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम व 64GB स्टोरेज अशा तीन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.

याशिवाय कंपनीने Redmi Note 7 Pro ची घोषणाही केलीये. यामध्ये 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर असून चायनीज नववर्षानंतर हा स्मार्टफोन लाँच केला जाईल.