बाजारात नव्याने येणाऱ्या एखाद्या नव्या मॉडेलचे फीचर्स लीक होण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसांत वाढले आहे. नुकतेच शाओमीच्या नव्याने दाखल होणाऱ्या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. कंपनीच्या Redmi 5 आणि Redmi 6 च्या सर्व मॉडेलना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कंपनी Redmi 7 pro लाँच करण्याच्या तयारीत होती. हा फोन प्रत्यक्ष बाजारात यायला वेळ लागणार आहे. मात्र त्याआधीच त्याची फीचर्स लीक झाली आहेत. मूळ चीनची वेबसाइट असलेल्या टीनावर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटच्या महत्वाची माहितीही लिक झाली आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार Redmi 7 pro मध्ये २.३ गीगाहर्ट्जचा ऑक्टाकोअर चिपसेट असेल. तर ३, ४ आणि ६ जीबी रॅमचे पर्याय असतील. तर ३२, ६४ आणि १२८ जीबीच्या मेमरीचीही सुविधा असेल. टीना या साईटवर हा मोबाईल ५.८४ एलसीडी डिस्प्लेसोबत लिस्ट करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हा मोबाइल २४ डिसेंबर रोजी बीजिंगमध्ये एका कार्यक्रमात लाँच होणार आहे. मात्र तो भारतात आणि इतर देशांमध्ये कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

तर कंपनी हा हँडसेटला ११ वेगवेगळ्या रंगात लाँच करण्याची शक्यताही यामध्ये वर्तविण्यात आली आहे. जर शाओमी ११ रंगात फोन बाजारात उतरवणार असेल तर शाओमीच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड जमा होणार आहे. हा मोबाइल ब्लॅक, पांढरा, ब्लू, रेड, पिवळा, पिंक, ग्रीन, गोल्ड, पर्पल, सिल्वर आणि ग्रे रंगात लाँच करण्यात येणार आहे. आता लीक झालेल्या फीचरप्रमाणेच या फोनचे फीचर आहेत का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader