Favourite Indian Dishes in Top: भारत हा खवय्यांचा देश आहे, असे म्हटले जाते. काही प्रमाणात हे सत्यही आहे. वैविध्यता हे भारताचं वैशिष्टय आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतही हे लागू होते. भारतात काही खाद्यपदार्थ मात्र, कमालीचे लोकप्रिय असून ते सर्रासपणे भारतीय आवडीने खात असतात. भारतीय पदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. असेच काही पदार्थ आहेत, जे २०२२ मधील सर्वोत्कृष्ट भारतीय पदार्थ ठरले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ पदार्थांच्या प्रेमात भारतीय

मसाला डोसा

भारतात सांस्कृतिक वैविध्य असल्याने, खाद्यसंस्कृतीतही बरीच विविधता आढळून येते. ‘डोसा’ हा असाच एक पदार्थ! दक्षिण भारतात प्रामुख्याने बनवला जाणारा हा पदार्थ आजकाल प्रत्येक रेस्ट्रॉरंटमध्ये उपलब्ध असतो. वेगवेगळ्या प्रकारात बनवले जाणारे डोशाचे प्रकार हे ‘ इंडियन पॅनकेक’ म्हणून ओळखले जातात.

(आणखी वाचा : Black Rice Benefits: तुम्ही काळ्या तांदळाचा भात कधी खाल्ला का? कॅन्सर-हृदयविकारांसह ‘या’ आजारांवर आहे गुणकारी! )

दाल मखनी

जेवणात दाल मखनी म्हणजे शाही मेजवानीच जणू. खरंतर दाल मखनी हा शाजी मेजवानीचाच प्रकार पण या दाल मखनीला आरोग्याचीही एक बाजू आहे. दाल मखनी खाल्ल्याने एक दोन नव्हे तर आरोग्यास अनेक फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ दाल मखनीतील गुणधर्मामुळे ही डाळ आहारात वरचेवर सेवन करण्याचा सल्ला देतात. दाल मखनी पौष्टिक होते ती काळे उडीद, राजमा, मसूर आणि हरभऱ्याच्या डाळींच्या एकत्रित गुणधर्मांमुळे.

बर्फी

आपल्याकडे सणावाराला गोडधोड खाण्याची परंपरा आहे. आता मिठाईमध्ये बर्फीचे आस्वाद घेतात.मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, तूप आणि वेलची हे दूध बर्फीचे घटक आहेत.

ढोकळा

ढोकळा, गुजरातमधील स्वादिष्ट पदार्थ आहे. चणे आणि तांदूळ पासून तयार केलेला हा एक चवदार शाकाहारी नाश्ता आहे. हे सामान्यत: नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी दिले जाते आणि त्यासाठी काही तासांची तयारी देखील करावी लागते. ढोकळा हे विशेषत: तळलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर चटणीसह दिले जाते.

(आणखी वाचा: Photos: वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या…)

वडा पाव

अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे तिन्ही जेवण म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही,असं होऊ शकत नाही. अगदी कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून गरमगागरम वडे आणि चटणी तयार केली जाते.

भरलेले पराठे 

पराठा खरा पंजाबातला. तिथल्या थंडीसाठी आणि घट्ट मनगटांसाठी व भल्या थोरल्या पोटासाठी हा असा भक्कम पदार्थ तयार केला असावा. पण तो आता भारतभर झाला आहे. त्याचे गुणच तसे आहेत. महाराष्ट्रात तर फक्त पराठ्याची म्हणून खास हॉटेल झाली आहेत.

(आणखी वाचा: पांढरा किंवा तपकिरी? कोणत्या रंगाचे अंडे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला )

पाणीपुरी

सर्वांनाच पाणीपुरी आवडते असे कोणी नाही की ज्याला पाणीपुरी आवडत नसेल, पाणीपुरी सगळ्यांच्या आवडीची असते, ती असायलाच हवी. लहान पुर्‍यांमध्ये भरलेले कांदेबटाटे, वाटाणे आणि इतर काही चवीचे पाणी म्हणजेच संपूर्ण देशाची आवडती पाणीपुरी आहे. 

चाट

चाट भारतीय आवडीने खातात. चाट म्हणजे तळलेले ब्रेड, चणे आणि बटाटे यांचे तुकडे, ताजी कोथिंबीर, आले असलेले दही आणि चिंचेची चटणी यांचा एक स्वादिष्ट पदार्थ आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yearender 2022 top favourite indian dishes in 2022 pdb