Yoga for pregnant women : गर्भधारणेदरम्यान महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पोषक आहार, निरोगी जीवनशैली स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा गरोदरपणात शारीरिक थकवा जाणवतो, पाठदुखीचा खूप त्रास होतो आणि सतत अस्वस्थपणा जाणवते. अशावेळी गर्भवती महिलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे, अत्यंत गरजेचे आहे. योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात एक योगा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सुप्त बध्दकोनासन योगा कसा करायचा, याविषयी माहिती दिली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे
योग अभ्यासक मृणालिनी या सुप्त बध्दकोनासन स्थितीत दोन ते तीन मिनिटे विश्रांती घेताना दिसतात. सुप्त बध्दकोनासन स्थितीत कशी विश्रांती घ्यायची, हे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. गर्भवती महिला हा योगा करू शकतात. विशेष म्हणजे हा योगा करताना कोणताही शारीरिक ताण येत नाही तर उलट विश्रांती घेता येते.
पाहा व्हायरल व्हिडीओ
yogamarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुप्त बध्दकोनासन (Reclining Butterfly Pose or Reclining Bound Angle Pose) च्या नियमित सरावाने गर्भवती महिलांना शारीरिक-मानसिक विश्रांतीबरोबर अजुन बरेच फायदे मिळतात.
सुधारित श्वासोच्छवास: छाती उघडल्याने श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते.
विश्रांती: या आसनामुळे पाठीचा खालचा भाग, नितंब, मांडीचे स्नायू शिथिल होण्यास मदत होते.
पेल्विक फ्लोअर मजबूत करणे: हे बाळाच्या जन्मासाठी शरीर तयार करण्यास आणि प्रसूती सुरळीत करण्यास मदत करू शकते.
सुधारित रक्त परिसंचरण: या आसनामुळे शरीराच्या खालच्या भागातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
अस्वस्थता कमी होते : या आसनामुळे पाठीच्या खालच्या भागातील तणाव आणि गर्भधारणेशी संबंधित अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.
गर्भधारणेदरम्यान कोणतेही व्यायाम किंवा आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.”
हेही वाचा : “तुम्हाला जिमची गरज नाही, फक्त कॉमन सेन्स वापरा’, मिलिंद सोमण यांनी सांगितला फिटनेस मंत्र
योग अभ्यासक मृणालिनी या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन योगांविषयी माहिती सांगतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये गर्भावस्थेत कोणती योगासन करू नये, याविषयी त्यांनी माहिती सांगितली होती. गरोदर असताना कोणती टाळली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे .
(टीप : गरोदरपणात कोणतेही व्यायाम किंवा योगासने करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)