दररोजच्या धावपळीत आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अनेकदा डॉक्टर किंवा तज्ज्ञ आपल्याला नियमित योगा किंवा व्यायाम करण्याचा सल्ला देतात पण आपण वेळ मिळत नाही, असे सांगून योगा, व्यायाम करणे टाळतो. नियमित व्यायाम किंवा योगा करणे, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. स्त्री पुरूष दोघांनीसुद्धा नियमित योगा करायला पाहिजे. आज आम्ही पुरुषांना फायदेशीर ठरेल अशी चार योगासने जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्रामवर योग अभ्यासक मृणालिणी या नवनवीन योगासंदर्भात माहिती देत असतात. नुकताच यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पुरुषांनी करावीत अशी चार योगासने सांगितली आहेत. या व्हिडीओमध्ये या योगासनाचे फायदे सुद्धा सांगितले आहेत.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –
१. वीरभद्रासन
शरीराला स्थिर आणि संतुलित करण्यास मदते. खांदे, पाठीचा खालचा भाग मजबूत आणि टोन होतो.
२. उत्कटकोनासन
पेल्विक फ्लोरचे आरोग्य सुधारते.इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये फायदेशीर ठरते. मांडीचा सांधा मजबूत बनतो.
३. मलासन
बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात. पाय, घोटे, आणि मांड्या लवचिक होतात.
४. बद्धकोनासन
किडनी, प्रोस्टेट ग्लँडसह ब्लॅडर सक्रिय होतात. पाठीचा मणका मजबूत होतो.सायटिकाच्या दुखण्यावर काही प्रमाणात आराम मिळतो.
हेही वाचा : Personality Traits : ब्लड ग्रुपनुसार ओळखा व्यक्तीचा स्वभाव, तुमचा ब्लड ग्रुप कोणता?
yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्त्रियांबरोबरच पुरुषांनी सुद्धा योगाभ्यास केला पाहिजे त्यामुळे –
१. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
२. पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होते.
३. शरीराची लवचिकता वाढते.
४. स्नायू आणि हाडांशी संबंधित समस्या दूर राहतात.
५. ताणतणाव कमी होतो व फ्रेश उत्साही वाटते.
प्रत्येक योगासनं साधारणतः ३० सेकंद ते १ मिनिटं करावे.
यासाठी व्हिडिओमध्ये दाखवलेली योगासने व सूर्यनमस्कार नियमितपणे करा.
योगासने करताना योगामॅट किंवा सतरंजी वापरा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यासाठी धन्यवाद” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली..”