विज्ञान व तंत्रज्ञान खात्यातील तज्ज्ञांची छाननी; संशोधनासाठी निधी
‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ योगा अँड मेडिटेशन’ (सत्यम) प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडे शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांकडून ६०० संशोधन प्रस्ताव आले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने स्थापन केलेली तज्ज्ञांची समिती त्यांची छाननी करत असून त्यातून २० ते २५ उत्कृष्ट प्रस्ताव निवडले जातील आणि त्यांना संशोधनासाठी खात्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे या खात्याचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल सायन्सेस अँड न्यूरोसायन्सेस अशा नामांकित संस्थांचा अर्जामध्ये समावेश असून निवड झालेल्या प्रत्येक प्रस्तावासाठी २० कोटी रुपये संशोधनवृत्ती देण्यात येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने गतवर्षी यासंबंधी योजना तयार करून प्रस्ताव मागवले होते. त्यात अर्ज करणाऱ्यांना योग आणि ध्यानधारणेतील संशोधनाचा पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. योगा आणि ध्यानधारणेचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य, शरीर, मन, मेंदू यांवर नेमका काय व कसा परिणाम होतो हो तपासणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा