Yoga to Reduce Neck Pain: रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आहार व झोप यांच्या वेळा न पाळणे, योगा किंवा व्यायाम न करणे या सगळ्या सवयींमुळे हळूहळू आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या काळातील कामांसाठी दिवसभर लॅपटॉपसमोर बसून राहावं लागतं. त्यामुळे मान व पाठीचा त्रास उदभवतो. एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्याने आपली हालचाल होत नाही आणि मग अशा त्रासांना आपणच आमंत्रण देतो. अशा वेळेस मान आणि पाठीचा त्रास कमी करण्यासाठी योगा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. त्यावर उपाय म्हणून अशी सहा योगासने आहेत; जी मानदुखी कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतात.

चाइल्ड पोज (बालासन)

चाइल्ड पोज (Child Pose) केल्याने मान, खांदे व पाठीवर एक सौम्य ताण सोडण्यास मदत होते. या आसनामुळे तणाव कमी होऊन, मन शांत वाटते. मानदुखीसाठी हा योगा उपयुक्त ठरतो.

कॅट-काऊ पोज (मार्जारासन बितिलासन)

कॅट-काऊ पोज (​Cat-cow pose) केल्यामुळे पाठीचा कणा आणि मानेमध्ये लवचिकता वाढते. जर पाठ आखडली असेल, तर तो त्रास कमी करण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरणदेखील सुधारते. जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कॅट-काऊ पोझ पाठीच्या हालचालींमध्ये लक्षणीय सुधारणा करते आणि वेदना कमी करते.

स्फिंक्स पोज ​(षलम्ब भुजंगासन)

स्फिंक्स पोज (Sphinx pose) पाठीचा कणा मजबूत करते. त्यामुळे पाठ आणि मानेवरचा ताण कमी होतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगामधील अभ्यासानुसार, स्फिंक्स पोजसारख्या बॅकबेंडचा सराव केल्याने पाठीचे आरोग्य सुधारू शकते आणि अस्वस्थता कमी होऊ शकते.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन (Seated forward bend) केल्याने मान आणि खांद्यासह संपूर्ण पाठीचा भाग ताणला जातो. हे आसन मज्जासंस्था शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते, त्यामुळे मानदुखी कमी होऊ शकते.

इयर टू शोल्डर स्ट्रेच

​Ear to shoulder stretch हा अगदी साधा स्ट्रेच मानेच्या बाजूंचा ताण कमी करतो. एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहिल्याने जेव्हा मान आखडते तेव्हा या स्ट्रेचमुळे लगेच आराम मिळू शकतो.

लेग्स-अप-द-वॉल पोज (विपरिता करणी)

लेग्स-अप-द-वॉल पोज ​(Legs up the wall pose) मान आणि खांद्यासह संपूर्ण शरीराला आराम देते. या पोजमुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि तणाव कमी होतो. त्याचप्रमाणे मानदुखीदेखील कमी होते.

All Photos- Freepik/Social Media

हेही वाचा… धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga poses to reduce neck pain instant relief lifestyle health tips dvr
Show comments