बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन आल्याचे आपण पाहतच असतो. तसेच विविध ई-कॉमर्स वेबसाइट उदाहरणार्थ अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अनेक उत्तम स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु, स्वतःसाठी त्यातला नेमका कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा हा प्रश्न पडतोच. याकरिता आज आम्ही तुम्हाला काही नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला ४ जीबी रॅमसह मोठी बॅटरी लाइफ मिळणार आहे. तसेच ह्यात विविध नवीन फीचर्स देखील असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या स्वस्त स्मार्टफोनबद्दल.
पोको सी३ किंमत (POCO c3)
पोको सी३ हा नवीन स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. या स्मार्ट फोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ५१२ जीबीपर्यंतचे एसडी कार्ड देखील तुम्ही यात इन्स्टॉल करू शकतात. ज्याची किंमत ८,४९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा फोन 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio G35 प्रोसेसरसह येतो. तसेच फोनच्या मागच्या पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा देण्यात आलेला आहे.
रेडमी ९i (Redmi 9i)
Redmi 9i हा स्मार्टफोन देखील फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची किंमत ८७९९ रुपये आहे. तर या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलेला आहे. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्ही ५१२ जीबीचे एसडी कार्ड इन्स्टॉल करू शकता. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि समोर ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो. कंपनीने त्यात मीडियाटेक हेलियो जी २५ प्रोसेसर दिला आहे.
Infinix हॉट 10 प्ले(Infinix Hot 10 Play)
Infinix हा स्मार्टफोन तुम्ही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील खरेदी करू शकता. या Infinix स्मार्टफोनची किंमत ८९९९ रुपये इतकी आहे. या किंमतीत तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलेला आहे. तसेच या फोनमध्ये ६.८२ इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर १३ + डेप्थ सेन्सर आहे आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. तुम्हाला या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरमध्ये येतो.
रीयलमी सी ११ २०२१ (Realme C11 2021)
रियलमी सी ११ या स्मार्टफोनची किंमत ८, ७९९ रुपये इतकी आहे. यात तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच युजर्सला आवश्यक असल्यास २५६ जीबी एसडी कार्ड जोडू शकतात. या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Realme या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.