Fruits Eating Benefits To Skin : फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिशन्स आणि विटॅमिन्स असतात. रोजच्या आहारात फळांचा समावेश करणे शरीरासाठी उपयुक्त ठरते. पण फळांचं सेवन केल्यानं एक मोठा फायदा होऊ शकतो. तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम ठेवण्यासाठी फळे खाणे अत्यंत आवश्यक आहे. फळे खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तसेच त्वचेवरील फाइन लाइंसच्या समस्येपासूनही दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आहारात फळांचे समावेश करणे अधिक फायदेशीर ठरु शकते. फळांचं सेवन केल्यावर तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यासही मदत होऊ शकते. तुम्हाला सलूनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करावे लागतील. त्वचा तजेलदार आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या या पाच फळांचं सेवन करु शकता.

१) टॉमेटो

टॉमेटोमध्ये मोठ्या प्रमाणात ल्यूटीनसारखे कॅरोटेनॉइड्स असतं. तसेच टॉमेटोमध्ये बिटा-कॅरोटिन आणि लायकोपीनचंही प्रमाण अधिक असतं. त्यामुळे टॉमेटोचं सेवन केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील रिंकल्स कमी होण्याची शक्यता असते. उन्हात फिरल्यानंतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या समस्येवर मात करण्यासाठीही फळांचं सेवन उपयुक्त ठरतात.

२) पपई

पपईमध्ये विटॅमिन ए,सी आणि बी असतं. तसंच पपईत मोठ्या प्रमाणात एंजाईमा असल्याने त्वचेच्या समस्येवर मात करणं सोपं होऊ शकतं. पपईमध्ये पॅंटोथेनिक अॅसिडही असतं. पपईच्या सेवनामुळं त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

नक्की वाचा – बद्धकोष्ठतेमुळं त्रस्त आहात? या ५ गोष्टी ठरू शकतात रामबाण उपाय, वाचा सविस्तर माहिती

३) सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. सफरचंदात मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं. तसेच अॅंटीऑक्सिडन्ट्स, पोटॅशियम, मग्नेशियम आणि डाएटरी फायबर्स असतं. सफरचंद खाल्ल्याने त्वचा तजेलदार आणि सुंदर राहण्यास मदत मिळते. सफरचंद खाल्ल्याने चेहऱ्यावरील डागही कमी होऊ शकतात.

४) कलिंगड
कलिंगड खाल्ल्याने त्वचा दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटिऑक्सिडन्ट्स आणि पाणी असतं. त्यामुळे शरीरातील सर्वप्रकारचं टॉक्सीन बाहेर काढणे शक्य होऊ शकतं. तसंचे कलिंगडमध्ये विटॅमिन सी असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील रिंकल्स दूर करण्यासाठी कलिंगडचं सेवन करु शकता.

५) स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये अल्फा हायड्ऱॉक्सी आणि सॅलिसायलिक अॅसिड असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील पुरळ येण्याची समस्याही दूर होऊ शकते. त्वचा ऑईली असेल किंवा त्वचेवर पुरळ असल्यास स्ट्रॉबेरी फळाचं सेवन तुम्ही करु शकता. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शारीरिक फायदे होतात. पण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी फळाचा समावेश करणं महत्वाचं ठरु शकतं.

Story img Loader