जर तुम्ही अॅण्ड्रॉइड मोबाईल्सचे चाहते असाल आणि नुकताच बाजारात आलेला गुगलचा पिक्सल टू हा फोन घेण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर गुगल पिक्सलवर चक्क २२ हजारांची सूट उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन ३९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुगल पिक्सल टू हा फोन ६४ जीबी (किंमत ६१ हजार रुपये) आणि १२८ जीबी (किंमत ७१ हजार रुपये) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट या फोनवर सरसकट ११ हजार एक रुपयांची सूट देत असल्याने हा फोन फ्लिपकार्टवरून घेतल्यास केवळ ४९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होईल. त्यात तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १० हजार रुपये सूट देण्यात आली आहे. ज्यामुळे फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये होते. त्यामुळे सर्व ऑफर्स वापरून या फोनवर एकंदरीत २२ हजारांची सूट मिळेल.

वाचा: सॅमसंगच्या या फोनच्या किंमतीत झाली घट

iPhone खरेदी करण्याची सुवर्ण संधी, ‘अॅपल फेस्ट’ला सुरूवात

याशिवाय ई-टेलरवर हा फोन घ्यायचा असल्यास एक्सचेंज ऑफरमध्ये १८ हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल. त्याशिवाय या फोनवर ३६ हजार ५०० रुपयांची बायबॅक गॅरंटीही देण्यात आली आहे. रिलायन्स जिओनेही हा फोन तगड्या ऑफर्ससहीत उपलब्ध करुन दिला आहे. रिलायन्स जिओच्या माध्यमातून हा फोन घेतल्यास २२ हजार ९९९ रुपयांचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. या ऑफर अंतर्गत एका वर्षासाठी जिओच्या ग्राहकांना ९ हजार ९९९ रुपये किंमत असणारा अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा पॅक मोफत मिळणार आहे. त्याशिवाय एचडीएफसीच्या कार्ड होल्डर्सला ८ हजारांपर्यंत विशेष कॅशबॅक जिओ देणार आहे.

‘गुगल पिक्सल टू’चे स्पेसिफिकेशन्स

> एचटीसी कंपनीची निर्मिती असणाऱ्या या फोनचा डिस्प्ले ५ इंचाचा आहे. या एचडी स्क्रीनचे रिझोल्यूशन १०८० x १९२० पिक्सल्स इतके आहे.

> हा फोन ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅग ८३५ वर काम करेल. शिवाय तो ४ जाबी एलपीडीडीआर फोर एक्स या उच्च प्रतिच्या रॅमला सपोर्ट करेल.

> ६४ जीबी आणि १२८ जीबी या दोन प्रकारांमध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

> या फोनचा रेअर कॅमेरा १२.२ मेगापिक्सल तर फ्रण्ट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा ३० फ्रेम प्रती सेंकदाच्या गतीने ४ हजार पिक्सल रिझोल्यूशनचे व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतो.

> फोनमध्ये २७०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.

पुढील तीन दिवसांसाठी झिओमीच्या फोनवर खास ऑफर!

जिओ देणार १९९ रुपयांत रोज १ जीबी डेटा