हल्ली अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास पुढे सरसावत आहेत. पण काहीजण असे देखील आहेत जे अजूनही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची रिस्क घेऊ इच्छित नाही. तुम्हाला सुद्धा गुंतवणूक करायची आहे पण धोका पत्करायचा नसेल तर भारतीय टपाल खात्याची योजना तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. इथे गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे आहेत. या योजनांमध्ये कर सवलतींसोबतच इतरही अनेक फायदे दिले जातात. पोस्ट ऑफिस आपल्याला अगदी लहान बचत योजना प्रदान करते, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला जास्त परतावा दिला जातो. तसेच, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रामीण सुरक्षा योजना आहे जिच्या अंतर्गत ३५ लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
ग्रामीण भागातील लोकसंख्येकरिता १९९५ साली ही योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना गावकऱ्यांना विमा संरक्षण देते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार जास्तीत जास्त गावकऱ्यांना लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. यासोबतच त्यांचा विमाही या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. कमीत कमी १९ वर्षे आणि जास्तीत जास्त ५५ वर्षे वय असणारे गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वर्षाला किमान १० हजार रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये गुंतवता येऊ शकतात.
SBI Alert: ग्राहकांसाठी मोठी बातमी; ‘या’ अटीची पूर्तता न केल्यास बंद होईल बँकिंग सेवा
योजनेतील काही ठळक मुद्दे
>> या योजनेअंतर्गत वयाच्या ८० व्या वर्षी बोनसचा लाभही दिला जातो.
>> गुंतवणुकीचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पैसे नॉमिनीच्या नावे केले जातात.
>> या योजनेत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
>> प्रीमियम जमा करण्यासाठी वाढीव कालावधी देखील दिला जातो.
>> ग्राम सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणताही गुंतवणूकदार तीन वर्षांनंतर त्याचे खाते सरेंडर करू शकतो.
आता NPS नाही तर OPS अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन पर्याय; जाणून घ्या तपशील
कसे मिळणार ३५ लाख रुपये ?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या १९व्या वर्षी जास्तीत जास्त १० लाखांची विमा पॉलिसी घेतली. तर त्याला ५५ वर्षांसाठी १५१५ रुपये प्रीमियम भरावा लागेल, तसेच ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये भरावे लागतील. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला अनुक्रमे ३१.६० लाख, ३३.४० लाख आणि ३४.६० लाख रुपये मिळतील.