Best Husband : नवरा-बायकोच्या नात्यात नेहमी काळजी, प्रेम, जिव्हाळा, विश्वास व समजूतदारपणा असावा लागतो. या नात्यात नवरा-बायकोच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतात. जसे की, प्रत्येक बायकोला वाटते की, तिचा नवरा चांगला असावा. अनेकदा कितीही प्रयत्न करूनही कोणी पुरुष चांगला नवरा बनू शकत नाहीत. त्यासाठी त्याच्या काही वाईट सवयी कारणीभूत असू शकतात. तर आज आपण पाहणार आहोत त्या वाईट सवयी कोणत्या?
टीका करणे
काही पुरुषांना सतत टीका करण्याची सवय असते. असे पुरुष कधीही चांगला नवरा बनू शकत नाहीत. कधी कधी सतत टीका केल्यामुळे जोडीदार नाराज होऊ शकतो किंवा दु:खी होऊ शकतो. अशा वेळी टीका करण्याऐवजी जोडीदाराला प्रेमाने समजावून सांगा.
निर्बंध घालणे
जर नवरा सतत बायकोवर निर्बंध घालत असेल, तर ते चुकीचे आहे. असा नवरा कधीही बायकोची प्रिय व्यक्ती बनू शकत नाही. कोणत्याही जोडीदाराला सहकार्य करणारा आणि प्रोत्साहन देणारा जोडीदार हवा असतो. अशात सतत निर्बंध लादल्यामुळे बायको चिडचिड करू शकते आणि त्यामुळे नात्यात कटूपणा येऊ शकतो.
हेही वाचा : अरेंज मॅरेजमध्येही मिळेल लव्ह मॅरेजसारखा आनंद, ‘या’ खास टिप्स जाणून घ्या; कोणीही म्हणेल जोडी असावी तर अशी…
समजून न घेणे
कोणत्याही नात्यात समजूतदारपणा असणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेतल्यामुळे नात्यात सलोखा वाढतो. जर तुमची बायको गृहिणी असेल किंवा नोकरी करीत असेल, तर तिच्यावरील कामांचे ओझे समजून घ्या. तिला तणाव येईल, असे वागू नका. तिच्या कामाला समान महत्त्व द्या.
प्रेम व्यक्त न करणे
काही पुरुषांना प्रेम व्यक्त करणे आवडत नाही. प्रेम व्यक्त केल्यानंतर जर तुमच्या पत्नीला खूप आनंद होत असेल, तर आवर्जून तुमच्या भावना व्यक्त करा. नात्यात प्रेम असेल, तर नाते दीर्घ काळ टिकते.
बोलण्याची पद्धत
असे म्हणतात की, व्यक्तीची भाषा ही नेहमी गोड असावी. जर बोलण्याची पद्धत चुकीची असेल, तर व्यक्तीचा स्वभाव कितीही चांगला असला तरी ती व्यक्ती वाईट ठरू शकते. त्यामुळे नवऱ्याने बायकोबरोबर
नेहमी आदरपूर्वक बोलावे आणि तिला कधीही तुच्छतेची वागणूक देऊ नये.
हेही वाचा : Joint Family : जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्याचे तगडे फायदे; वाचाल तर कधीही एकटे राहणार नाही
खोटे बोलणे
जर नवरा वारंवार खोटे बोलत असेल, तर तो कधीही बायकोचा विश्वास जिंकू शकत नाही. त्यामुळे नात्यात तेढ निर्माण होऊ शकते आणि नाते तुटूही शकते. त्यामुळे कधीही आपल्या जोडीदाराबरोबर खोटे बोलू नये.
जास्त अपेक्षा ठेवणे
नात्यात एकमेकांपासून अपेक्षा ठेवणे काहीही चुकीचे नाही; पण जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. कोणतीही व्यक्ती ही परफेक्ट नसते. त्यामुळे जोडीदार प्रत्येक वेळी तुमच्या अपेक्षा पूर्ण करील, असे नाही. त्यामुळे नवऱ्याने बायकोकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नये.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)