Benefits Of Eating Soak Walnuts: सुक्या मेव्यामध्ये अक्रोड आरोग्यासाठी खूप उपयोगी असून यामध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अक्रोड हे पोषक तत्वांनी युक्त एक अतिशय पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी आढळतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आरोग्य तज्ञ देखील दररोज अक्रोड खाण्याचा सल्ला देतात. रोज अक्रोड खाणे खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना अक्रोड भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे आवडते. अक्रोड खाण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.उन्हाळ्यात अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णता दूर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका दिवसात किती अक्रोड खावेत?
तुम्ही रोज २-३ अक्रोड खाऊ शकता. मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता. जास्त अक्रोड खाल्ल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

अक्रोड भिजवून खावे :
उन्हाळ्यात भिजवलेले अक्रोड खावे. यामुळे उष्णता दूर होते आणि पौष्टिक घटक वाढतात. अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी भिजवलेले अक्रोड खा. मात्र, हिवाळ्यात तुम्ही अक्रोड न भिजवता खाऊ शकता.

सुक्या मेव्यामध्ये अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. अक्रोड कोणत्या रोगांमध्ये फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

मेंदूसाठी फायदेशीर :

अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात जे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि न्यूरॉन्स टिकवून ठेवण्यास मदत करतात.अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक मेंदूपर्यंत सहज पोहोचतात. याशिवाय अक्रोडमध्ये असलेले एल-कार्निटाइन मेंदूचे कार्य सुधारते. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि तणाव आणि चिंतेपासून आराम मिळतो.

त्वचा राहते मऊ :

अक्रोड खाल्ल्याने त्वचा मऊ राहते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल तर रोज अक्रोड खा. यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल. वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडणे सामान्य गोष्ट आहे. पण अक्रोड खाल्ल्याने या सुरकुत्या कमी होऊ शकतात.

वजन कमी करण्यास मदत :

हल्ली लठ्ठपणाच्या समस्येने सगळेच हैराण झाले आहेत. वजन कमी करण्‍यासाठी आहार आणि व्‍यायाम यात समतोल राखणे आवश्‍यक आहे. अक्रोड हे एक ड्राय फ्रूट आहे जे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. अक्रोडमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते. रोज अक्रोड खाल्ल्याने चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा >> आला उन्हाळा, तब्येतीला सांभाळा! डिहायड्रेशन म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितली लक्षणे आणि उपाय

हृदयविकाराचा धोका कमी असतो :

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You must eat walnuts in summer know in what quantity and when should you eat them lifestyle why soak walnuts in summer srk
Show comments