तुम्हाला आयुष्यात यश मिळेक की अपयश हे तुमच्या सवयींवर अवलंबून असतं. जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या सात गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात तुम्हाला समावेश करावा लागेल. जर तुम्ही या सवयींचा तंतोतंत पालन केलं, तर तुम्हाला यशाचे उंच शिखर गाठण्यात कोणीही रोखणार नाही. यशप्राप्तीचा अर्थ विविध लोकांसाठी वेगवेगळा असू शकतो. पण कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी विशेषत: करिअरमध्ये यशप्राप्ती मिळण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. आम्ही तुम्हाला ज्या सात सवीयंबद्दल सांगणार आहोत, त्यांचा तुम्ही तुमच्या जीवनात तातडीनं समावेश करायला पाहिजे.
१) समस्येवर उपाय शोधा
आपण जेव्हा ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करतो, त्यावेळी अनेकदा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण हताश न होता त्या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. समस्येत अडकून राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना आखल्या पाहिजेत. आपण हाती घेतलेल्या कामाबद्दल इतरांचे मदभेद असल्यास त्यांच्यासोबत वादविवाद करु नका. शांतपणे अडचणींचा सामना करून पुढे जा.
२) घाईघाईने कामं करु नका
एखादं ध्येय गाठायचं झाल्यासं आपण नेहमी घाईघाईने काम करण्याची मोठी चूक करतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ही सवय सोडावी लागेल. घाईने केललं काम चांगलं समाधान देत नाही. अतिशय घाईत केलेलं कामं अनेकदा चुकीचं होतं आणि आपल्याला ते पुन्हा नव्याने सुरु करावं लागतं. त्यामुळे तुमची वेळ वाचण्याऐवजी अधिक खर्च होते.
३) कामाला टाळणं बंद करा
आजचं काम उद्यावर सोडणं, अनेकांना अशी सवय पूर्वीपासून असेल. पण जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्ही ही सवय तातडीनं सोडली पाहिजे. एखादं काम तुम्ही वेळेवर केलं नाही, तर तुमच्यासमोर अनेक कामांचा व्याप वाढत जातो. अशा परिस्थितीत आपण शेवटच्या क्षणी काम करण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे तुमचं लक्ष कोणत्या एका गोष्टीवर राहत नाही. त्यामुळे काम करत असताना चुका होण्याची शक्यता वाढते आणि विचार न करताच तुम्ही काम सुरु करता.
४) दुसऱ्यांवर आरोप करू नका
करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर झालेल्या चुका मान्य करायला हव्यात. स्वत: केलेल्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडण्याची सवय काही लोकांना असते. पण असं करणे चुकीचं असतं. त्यामुळं अशा सवयींपासून दूर राहिलं पाहिजे. कारण दुसऱ्यावर आरोप केल्यावर वादविवाद होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तुमचा महत्वाचा वेळ वाया जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा विचार न करता दुसऱ्यावर आरोप केल्यामुळं तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे जाऊ शकता.
५) जुन्या चुकांमधून बोध घ्या
तु्म्ही तुमच्या चुका मान्य केल्या पाहिजेत, कारण जर का तुम्ही चुकांचा स्वीकार केला नाही, तर चुकांमधून तुम्हाला कोणत्याच प्रकारचा बोध घेता येणार नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला चुकांमधून बोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही पुन्ही ती चूक करताना विचार करु शकता. जी माणसं चुकांमधून धडा घेत नाहीत, त्यांना करिअर मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
६) आवश्यकता असल्यास मदत करा
जी माणसं दुसऱ्यांकडून मदत घेत नाहीत, तु्म्ही अशा लोकांनाही भेटला असाल. यामागे कोणतंही कारण असू शकतं. लोकांकडू मदत मागण्यात त्यांना कमीपणा वाटत असेल किंवा अशी माणसं दुसऱ्यांपेक्षा स्वत:ला चांगली समजतात. पण जो गरजेच्या वेळी दुसऱ्याकडून मदत घेतो, तो एक समजदार व्यक्ती असतो. जर तुम्हाला एखाद्या समस्येतून बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही जाणकार लोकांचे सल्ले घेऊ शकता.
७) कामात आळस करु नका
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आळशी नसले पाहिजेत. काम करताना तुम्ही एकाग्र होऊन केलं पाहिजे. आळशी होऊन काम केल्यावर ते पूर्ण होत नाही. त्यामुळे आळस हा माणसाचा शत्रू असतो, असं म्हटतं जातं आणि ते सत्यच आहे. आळस बाजूला ठेऊन काम केल्यावर तुम्हाला यशप्राप्ती होईल.