दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून काम करणे हे आता अत्यावश्यक झाले आहे. कामाचा भाग म्हणून हे करावे लागत असले तरीही अशाप्रकारच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. स्पाँडिलायसिस, डोळ्यांच्या तक्रारी, अंगदुखी यांसारखे अनेक त्रास होतात. आता काम तर करावेच लागणार पण अशा तक्रारी उद्भवू नयेत म्हणून काही सोप्या युक्त्या वापरल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. आता काय आहेत या युक्त्या ज्यामुळे तुमच्या शारीरिक तक्रारी दूर होण्यास मदत होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • कॉम्प्युटरच्या स्क्रीनची स्थिती योग्य असू द्या

तुमचे डोळे आणि कॉम्प्युटरची स्क्रीन यामध्ये योग्य ते अंतर असावे. ही स्थिती योग्य असल्यास डोळ्यांना त्रास होत नाही. कॉम्प्युटरवर बसलेले असताना मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कीबोर्ड तुमच्य जितका जवळ तितका चांगला त्यामुळे डोळ्याला आणि टाईप करायला त्रास होत नाही.

  • लिफ्टचा वापर टाळा

आपण जिने चढताना किंवा अगदी उतरनाही लिफ्टचा वापर करतो. मात्र तुम्हाला दिवसभर कॉम्प्युटरवर बसावे लागत असेल तर असे करणे टाळा आणि जिन्यांचा वापर करा. त्यामुळे तुमच्या काही कॅलरीज तरी जळण्यास मदत होईल.

  • बसल्याबसल्या थोडा व्यायाम करा

सतत एकाच जागी एका अवस्थेत बसल्याने शरीराचे स्नायू आखडण्याची शक्यता असते. त्यामुळे ठराविक वेळाने शरीराच्या हलचाली करा. त्यामुळे शरीर मोकळे होण्यास मदत होईल आणि अंगदुखीचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

  • फॉन्ट मोठा ठेवा

अनेकांना कॉम्प्युटरवरच्या अक्षरांचा फॉन्ट लहान ठेऊन काम करायची सवय असते. मात्र त्यामुळे डोळ्याला त्रास होऊ शकतो. लहान फॉन्टमुळे डोकेदुखीही होऊ शकते. त्यामुळे काम करताना फॉन्ट कायम मोठा ठेवा.

  • भरपूर पाणी प्या

कामाच्या नादात आपण अनेकदा पाणी प्यायचे विसरतो. मात्र शरीराला पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असते. तसे न झाल्यास विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे ठराविक वेळाने पाणी पित राहा. याशिवाय लिंबू सरबत, एनर्जी ड्रिंकही घेतलेले चांगले. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यासही मदत होते.