शरिराची हाडे मजबूत असल्यास धावणे, चालने सहज होते, अन्यथा थकवा, अशक्तपणा जाणवतो. सांधे आणि कंबरदुखीचा त्रास होतो. हाडे कॅल्शियममुळे बळकट होतात. म्हणून हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शिमय महत्वाचे आहे. अशावेळी अनेक लोक कॅल्शियम पावडरचे सेवन करतात. पण, काही घरगुती उपयांनी तुम्ही कॅल्शियमची गरज पूर्ण करून हाडे मजबूत करू शकता.
आपल्या शरिराला रोज १ हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते, जी रोजच्या जेवनातून पूर्ण होत नाही. मात्र, काही फळे आणि भाज्यांच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यांच्या सेवनातून कॅल्शियमची कमतरता दूर होऊ शकते आणि हाडे मजबूत होऊ शकतात.
कॅल्शियमसाठी या पदार्थांचे करा सेवन
१) खसखसच्या बिया
खसखसच्या बिया कॅल्शियमचे चांगले स्रोत आहे. रोज एक चमचा खसखसच्या बियांचे सेवन केले तर कॅल्शियमची कमतरता दूर करता येऊ शकते. खसखस थेट खाण्याऐवजी तुम्ही खसखसयुक्त खीर किंवा लाडूचे सेवन करू शकता.
(मुलांना आहारात द्या ‘हे’ पौष्टिक पदार्थ, डोळ्यांची दृष्टी वाढण्यात होईल मदत)
२) चिया सिड्स
चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते. रोज एक ते दोन चमचा चिया सिड्सचे सेवन करून कॅल्शियमची कमतरता दूर करता येऊ शकते. चिया सिड्समधून कॅल्शियमच नव्हे तर मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस देखील मिळते.
३) सूर्यफुलाच्या बिया
कॅल्शियमची कमतरता असल्यास एक कप सूर्यफुलाच्या बियांचा आपल्या आहारात समावेश करा. सूर्यफुलाच्या बिया हाडे मजबूत करण्यासह स्नायूंसाठी देखील फायदेशीर आहे.
४) जवसाच्या बिया
एक ते दोन चम्मच जवसाच्या बिया खाल्ल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. जवसाच्या बिया भिजवून किंवा त्याचे स्मुदी बनवून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. जवसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
(Diwali gold purchase : दिवाळीत सोने खरेदी करताय? खरे की खोटे असे ओळखा)
५) तीळ
तीळ ही आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. तीळ कॅल्शियमचे चांगले स्त्रोत आहे. आहारात तिळाचा समावेश करा. तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता. यातून तुम्हाला कॅल्शियम मिळेल जे हाडे मजबूत करेल.
६) राजगिऱ्याच्या बिया
राजगिऱ्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या बियांच्या सेवानाने कॅल्शियमची कमतरता दूर होते. रोज एक चमचा राजगिऱ्याच्या बिया खाल्ल्यास भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. तसेच बियांमधील पोषक तत्व रक्तपेशी वाढवण्यात देखील मदत करतात. या बियांच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यात देखील मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)