एखाद्याला ब्लॉक करण्याची आपली कारणं काही वेगळी असू शकतात. भांडणं, वैयक्तिक वाद किंवा आणखी काही. युजरला ब्लॉक केल्यानंतर त्याला अनब्लॉक करण्याचा पर्याय फेसबुक, व्हॉट्स अॅपवर दिलेला असतो पण तुम्ही एखाद्या फॉलोअरला इन्स्टाग्रामवर ब्लॉक करता तेव्हा मात्र तुम्हाला खालील पाच गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे.
१. जर एखाद्या युजरला तुम्ही इन्स्टावर ब्लॉक करता तेव्हा त्या व्यक्तीला तुमची इन्स्टा स्टोरी, फोटो किंवा कॉमेंट पाहता येत नाही. तुम्ही केलेल्या कॉमेट, लाईक्सच्याही नोटिफिकेशन त्या व्यक्तीला जात नाही.
२. आश्चर्य म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केलं तरीही ती व्यक्ती तुम्हाला पोस्टमध्ये मेन्शन करू शकते. अर्थात तुमच्या अॅक्टीव्हीटीमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही, पण ती व्यक्ती तुम्हाला मेन्शन मात्र नक्कीच करु शकते.
३. ब्लॉक केल्यानंतरही संबधित व्यक्तीने भूतकाळात तुमच्या पोस्टवर केलेल्या कॉमेंट किंवा लाईक्स या डिलिट होत नाही. त्या पोस्टच्या खाली तशाच राहतात यासाठी तुम्हाला ती स्वत:हून डिलिट करावी लागले.
४. ब्लॉक केल्यानंतरही ती व्यक्ती तुम्ही फॉलोअर्सच्या पोस्टवर केलेल्या कॉमेंट पाहू शकते. जर तुम्हा दोघांचेही फॉलोअर्स किंवा फॉलोईंग प्रोपाईल एकच असेल तर तुम्ही केलेल्या प्रत्येक कॉमेंट त्या युजर्सला देखील दिसतात.
५. एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केल्यानंतर ती कायमस्वरुपी ब्लॉकच्या यादीत राहते असं नाही, तुम्ही तिला अनब्लॉकही करू शकता. यासाठी इन्स्टाग्रामच्या सेटिंगमध्ये अनब्लॉक प्रोफाईलचा पर्याय दिलेला आहे.