व्हिडीओ गेमिंगबद्दल एक सामान्य समज आहे की ते लोकांना सैल आणि सुस्त बनवते. विशेषतः मुलांना लागलेली ही सवय त्यांना मैदानी खेळांपासून दूर करते. यासोबतच आपला स्क्रीन टाइम जास्त असल्यास त्याचा आपल्या डोळ्यांवरही परिणाम होतो. पण आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर गेमिंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल, परंतु हे खरे आहे. जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांना त्यांच्या नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की एक्सरगेमिंग (Exergaming) किंवा अ‍ॅक्टिव्ह व्हिडीओ गेमिंग शरीराला पूर्णपणे सक्रिय ठेवण्यास मदत करू शकते आणि ही क्रिया तुमच्या आरोग्यासाठी चांगली असल्याचे सिद्ध होऊ शकते.

याद्वारे लोक त्यांच्या आवडीचा खेळ निवडू शकतात, असे संशोधकांचे मत आहे. डान्स रिव्होल्यूशन, ईए स्पोर्ट्स अ‍ॅक्टिव्ह आणि बीट सेव्हर हे काही लोकप्रिय एक्सरगेम्स आहेत. हे गेम्स पारंपरिक व्हिडीओ गेम्सपेक्षा वेगळे आहेत. या अभ्यासात असे दिसून आले आहे की एक्सरगेम्समुळे एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळते आणि व्यायाम टाळण्याच्या प्रवृत्तीवर किंवा संकोचावर मात करता येते. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट अँड एक्सरसाइज सायकोलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

देशातील १० राज्यांमध्ये सुरु होणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर; १८ शाळांमध्ये दिले जाणार प्रशिक्षण

एक्सरगेमिंग म्हणजे काय?

याला फिटनेस गेम असेही म्हणतात. व्हिडीओ गेमसह व्यायाम करण्याच्या क्रियाकलापांसाठी हा शब्द (एक्सरगेमिंग) वापरला गेला आहे. यामुळेच हा एक प्रकारचा व्यायामही मानला जातो. एक्सरगेमिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यावरून शरीराचा वेग आणि त्याच्या प्रतिक्रियांचा मागोवा घेता येतो. हे सक्रिय जीवनशैली म्हणून स्वीकारले जाऊ शकते.

कसा केला अभ्यास?

या अभ्यासासाठी, अशा ५५ लोकांचा समावेश करण्यात आला होता ज्यांची शारीरिक क्रिया दर आठवड्याला मानक १५० मिनिटांपेक्षा कमी होती. या लोकांना सहा आठवड्यांसाठी, प्रति आठवडा एक्सरगेम्सचे ३ वर्ग किंवा पारंपारिक एरोबिक्स एक्सरसाइज यापैकी एक निवडण्यास सांगितले. व्यायामादरम्यान सहभागींची शारीरिक हालचाल एक्सेलेरोमीटरने मोजली गेली. याव्यतिरिक्त, हृदय गती देखील मोजली गेली. यावरून हे लक्षात आले की सहभागी किती मेहनत करायला तयार आहेत. दरम्यान, संशोधकांनी त्यांच्या आनंदाचे आणि त्यांना वर्कआऊटसाठी प्रेरित करणाऱ्या मूल्यांचेही मूल्यांकन केले.

Investment करण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या, कशी आणि कुठून सुरु करावी पहिली गुंतवणूक

अभ्यासातून काय निष्पन्न झाले?

ज्यांना पारंपारिक व्यायाम करण्यास सांगितले होते त्यांनी एक्सरगेम्स खेळणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत घेतली. एखादे अवघड काम करण्यासाठी कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे असे त्यांना वाटले. या उलट, एक्सरगेम्स खेळणाऱ्यांचा वेळ चांगला होता. नियमित व्यायाम करण्यापेक्षा त्यांच्या मनात वेगळी स्वतंत्र भावना होती.

संशोधकांनी शिफारस केली आहे की जेव्हाही तुम्ही एखादा गेम खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की त्यात काही शारीरिक हालचालींच्या खेळांचाही समावेश असावा कारण असे गेम खेळताना अनेक मुलांना किंवा प्रौढांना ते व्यायाम करत आहेत असे वाटत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You will be shocked after reading the benefits of video games to the body know exactly how pvp