– डॉ. डेव्हिड मेज

मी माझ्या बाळासाठी योग्य उत्पादन वापरत आहे का? माझ्या बाळाच्या नाजूक त्वचेला ते साजेसे आहे का? नैसर्गिक उत्पादने वापरणे सुरक्षित आहे का? माझ्या बाळाला लावलेले लोशन चिकट आहे का? उग्र वासामुळे बाळाला त्रास होईल का? बाळाच्या डोळ्यांना इजा करतील, अशी तीव्र केमिकल शाम्पूमध्ये आहेत का? बेबी प्रोडक्टमध्ये वापरलेल्या प्रिझर्व्हेटिव्हची मला खात्री नाही, त्याचे दुष्परिणाम होतील का?काय सुरक्षित आहे आणि काय टाळले पाहिजे? बाळाचे संगोपन करत असताना, हे सगळे प्रश्न तरुण पालकांना त्यांच्या अपत्याला वाढवत असताना पडतात. या प्रश्नांवर व संभ्रमावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने, डॉ. डेव्हिड मेज यांनी पालकांना बाळाच्या स्किनकेअरबद्दल काय माहीत असू शकते व काय माहीत नसू शकते आणि गेल्या काही वर्षांत स्किनकेअर कशा प्रकारे विकसित झाले आहे, याविषयी माहिती दिली.

गेल्या काही वर्षांत बेबी केअर क्षेत्र कमालीचे विकसित झाले आहे. याचे श्रेय माहीतगार व जाणकार तरुण पालकांना जाते. बाळाच्या देखभालसाठी ते आधुनिक पद्धती स्वीकारत आहेत आणि संशोधनावर आधारित उत्पादनांची निवड करण्याला प्राधान्य देत आहेत. बाळासाठी खरेदी करायच्या उत्पादनाच्या कामगिरीचा पुरावा त्यांना हवा असतो आणि यासाठी त्यांचा सर्वाधिक विश्वास डॉक्टरांवर असतो. त्यानंतर, ते गुगलची मदत घेतात. काही बाबतीत हे उलटही दिसून येते. माझ्या पहिल्या भारत दौऱ्यामध्ये मला जाणवले की, ग्राहकांसाठी आज प्रचंड माहिती उपलब्ध आहे आणि यातील काही माहिती पालकांची सहज दिशाभूल करू शकते किंवा त्यांना संभ्रमात टाकू शकते. नेमके काय वापरावे आणि ते बाळासाठी सुरक्षित आहे का, याचा विचार माता सतत करत असतात. तसेच, काही जुन्या प्रथा काही विचार न करता अंधपणे पाळल्या जात आहेत. आजच्या बदलत्या वातावरणामध्ये टिकून राहण्यासाठी, अनेक जुन्या परंपरा व घरगुती उपाय यांचे पुन्हा मूल्यमापन करणे गरजेचे आहे. हेल्थकेअर प्रोफेशनलशी पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

नैसर्गिक हे नेहमीच सुरक्षित असते, हा संभ्रम पालक, डॉक्टर आणि एकूणच जगापुढे पडलेला आहे, असे मला आढळले आहे. एखादा घटक नैसर्गिक पद्धतीने मिळवला आहे की सिंथेटिक पद्धतीने, याचा त्याच्या आरोग्यदायकपणावर, सुरक्षेवर किंवा विषारीपणावर काही परिणाम होत नाही. “ऑरगॅनिक” किंवा “नैसर्गिक” असे शब्द परवलीचे झाले आहेत आणि त्यात बदल होईल, असे दिसत नाही. परंतु, नैसर्गिक म्हणजे सुरक्षित व केमिकल-मुक्त असते, असे अनेकदा लोकांना वाटते, हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व हर्बल उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे दुष्परिणाम होतात का किंवा ते बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित आहे का, हे कोणी तपासले हे का. माझ्या मते, सगळे नैसर्गिक घटक चांगले असतात असे नाही आणि सर्व सिंथेटिक घटक वाईट असतात असे नाही. नैसर्गिक असो किंवा सिंथेटिक/केमिकल, प्रत्येक घटकाची परिणामकारकता व सुरक्षितता तपासण्यासाठी त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. नैसर्गिक की केमिकल हा वाद सोप्या पद्धतीने मिटवला जातो, कारण अनेक ग्राहकांच्या मते एखादे उत्पादन जितके नैसर्गिक असते तितके सुरक्षित व उत्तम असते. पण हा विषय इतका सोपा नाही आणि हा विषय अशा प्रकारे सुलभपणे मिटवणे म्हणजे ग्राहकांना योग्य सेवा न देणे आहे.

नैसर्गिक घटक सुरक्षित असतात, कारण ते नैसर्गिक पद्धतीने वाढलेले असतात, ही चुकीची समजूत आहे. उदा: भारतात, लोकांनी पाणी पिण्यापूर्वी ते उकळून घेणे आवश्यक असतेत. या तुलनेत, अमेरिकेत तसे करावे लागत नाही व थेट नळाचे पाणी पिता येते. आणखी एक उदाहरण म्हणजे, दूध. दूध वापरण्यासाठी योग्य ठरण्यापूर्वी ते पाश्चराइज करावे लागते. पाणी व दूध हे दोन्ही “नैसर्गिक” आहे, पण त्यातील सुरक्षितता गृहित धरता येऊ शकत नाही.

तुम्हाला माहीत असावे असे वास्तववादी घटक: 1) उत्पादनातील गंधामुळे कॉर्टिसोल पातळी कमी करण्यासाठी मदत होते आणि त्याचा नियमित वापर करत असताना, बाळाला बराच वेळ झोप लागण्यासाठी मदत होऊ शकते. 2) प्रिझर्व्हेटिव्हमुळे मायक्रोऑरगॅनिझमची वाढ रोखण्यास मदत होते. प्रत्येक उद्योगाचा मार्गदर्शक तत्त्वानुसार डिझाइन, स्क्रीन व चाचणी केली असता, अन-फॅग्रन्स्ड स्किनकेअर उत्पादनाच्या तुलनेत फॅग्रन्स्ड स्किनकेअर उत्पादनाचे काही फायदे आहेत.

काही फ्रॅग्रन्स शांततेशी व ताण कमी होण्याशी संबंधित असतात, काहींमुळे दक्ष राहण्याचे प्रमाण वाढते व मूडही चांगला होतो. काहींमुळे पालक व पाल्य यांच्यातील नाते घट्ट होण्यासाठी मदत होते. उत्पादनांमुळे त्वचेवर होऊ शकणारे परिणाम व अॅलर्जीचे परिणाम कमी करण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने इंटरनॅशनल फ्रॅग्रन्स असोसिएशनने (आयएफआरए) महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे. प्रिझर्व्हेटिव्हचा विचार करता, चुकून पाणी झिरपणे, हवेतील मायक्रोब्स, बरणीमध्ये बोटे घालणे, ट्युबच्या तोंडावर हात ठेवणे यामुळे उत्पादने प्रदूषित होऊ शकतात. त्यामुळे, ताजेपणा टिकून राहण्यासाठी व युजरचे संभाव्य दूषितीकरणापासून रक्षण करण्यासाठी कोणत्याही उत्पादनामध्ये विशिष्ट प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह वापरणे गरजेचे असते.

विचारात घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बाळाची त्वचा ही प्रौढांच्या त्वचेपेक्षा वेगळी असते. बाळाच्या त्वचेतील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी व अधिक होते. त्यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायजिंग घटक असतात, आणि अनेकदा दिसत नसली तरी कोरडी असते. त्वचेतील पाणी पाचपटीने जलद नाहीसे होते. बाळाची त्वचा अधिक नाजूक व अधिक संवेदनशील असू शकते. बाळाची त्वचा अनेकदा क्लिनिकली ड्राय असते. इमोलिएंट्सचा वापर विचारात घेता, त्यांची निवड काळजीपूर्वक करावी, कारण त्यातील सर्वच बाळाच्या त्वचेला (नॅचरल ऑलिव्ह ऑइल व अन्य कूकिंग ऑइल यामध्ये उच्च प्रमाणात ओलेइक अॅसिड असू शकते व त्यामुळे स्किन बॅरिअरचे नुकसान होऊ शकते) साजेसे असते असे नाही.

तुम्हाला माहीत का, केवळ पाण्याचा वापर करून त्वचेवरील केवळ 65% तेल व मळ काढता येऊ शकतो. आणि जो त्वचेवर उरतो त्यामुळे त्वचा चुरचुरू शकते. जन्मानंतर लगेचच बाळाला अंघोळ घालावी की नाही, याबद्दल बहुतेकशा पालकांना संभ्रम असतो. आमची उत्पादने फॉर्म्युलेटेड असतात आणि पहिल्या अंघोळीसाठी वापरता येऊ शकतात. भारतीय बाळांना जन्मतः अधिक केस असू शकतात. त्यामुळे, त्यांना सौम्य क्लीन्झरने अंघोळ घालणे व जन्मानंतर दिसणाऱ्या अनावश्यक गोष्टी काढून टाकणे गरजेचे असते. बाळ मोठे होत असताना, दुधामुळे किंवा दिवसभराच्या अन्य उपक्रमांमुळे बाळाच्या त्वचेवर चिकट किंवा वॅक्सी घटक असू शकतात. बेबी क्लीन्झरचा वापर केल्याने, त्वचेच्या पृष्ठभागाला धक्का न लागता हे अनावश्यक घटक काढून टाकता येऊ शकतात. क्लिनिकल स्टडीजच्या मते, सौम्य बेबी क्लीन्झरने अंघोळ घालणे, त्यानंतर विशेषतः बाळाच्या त्वचेसाठी तयार केलेल्या मॉइश्चरायजरचा वापर केल्याने निरोगी स्किन बॅरिअर टिकवण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी मदत होते. मेंदूचा व बाळाचा निरोगी विकास होण्यासाठी स्पर्श, सहभागी व दैनंदिन उपक्रम कसे फायदेशीर ठरू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

उत्पादनातील प्रत्येक घटकाचा विशिष्ट उद्देश असायला हवा आणि पालकांनी सौम्य व हळूवार असल्याचे क्लिनिकली सिद्ध झालेले असल्याची खात्री करून घ्यावी. उत्पादनांतील घटक बाळाच्या नाजूक त्वचेसाठी साजेसे असणे, तसेच कोरडेपणापासून संरक्षण करणारे असणे व त्वचा मऊ राखणारे असणे महत्त्वाचे आहे. साहजिकच, बाळाचा आरामदायीपणा व कल्याण यांना सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे आणि बाळाला एखाद्या विशिष्ट घटकाची अलर्जी आहे का, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. दुष्परिणाम होण्याचा धोका कमी करण्यासाठी पालक व हेल्थकेअर प्रोफेशनल यांनी पॅराबेन्स, डाय व चुरचुरणारे फ्रॅग्रन्स नसलेल्या उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवे. उत्पादन वापरण्याचा अनुभव उत्तम असायला हवा आणि पॅकेजिंग वापरण्यासाठी सुलभ असावे. उत्पादन वापरत असताना पालक किंवा केअरगिव्हरना संघर्ष करावा लागू नये आणि ते उत्पादन बाळासाठी आरामदायी असावे.

(लेखक जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर इंकचे वरिष्ठ संचालक आहेत. )

Story img Loader