आपण आपल्या संपूर्ण दिवसापैकी एक तृतीयांश वेळ म्हणजे कमीत कमी आठ तास झोप काढणं आवश्यक आहे. परंतु आपण आपल्या दिवसाच्या या अत्यंत महत्त्वाच्या वेळेकडे क्वचितच लक्ष देतो. रात्रीच्या वेळी चांगली झोप ही आपल्या आरोग्यावर एकूणच आपल्या दिनचर्येवर खूप मोठा प्रभाव टाकते हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याची सुरूवात तुमच्या बेडवरील गादीपासून होते. रात्री झोपताना तुमच्या पाठीखाली असलेल्या गादीवर तुमची रात्रीची झोप किती वेळेची आणि किती चांगली असेल हे अवलंबून असतं. रात्रीच्या झोपेवर परिणाम करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोपेच्या समस्या दूर करणे: तुमची गादी झोपेच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते ?

आपल्यापैकी बर्‍याच जणांना यावर शंका असते. पण आता संशोधनाने हे सिद्ध केलंय की, तुमच्या बेडवरची गादी ही तुमच्या रात्रीच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, झोपेची गुणवत्ता, आराम आणि स्पाइनल अलाइनमेंट सुधारण्यासाठी मखमलीसारखी मऊ व गुळगुळीत गादीचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुमच्या रात्रीच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला की तुमच्या आरोग्यावर आपोआर परिणाम जाणवू लागतात.

तुमची गादी शरीरातल्या वेदना कमी करण्यास मदत करते का?

तीव्र पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांना बऱ्याचदा योग्य गादी वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. शरीर दुखणं याला तुमच्या झोपण्याच्या वेळी वापरली जाणारी गादी हे देखील एक कारण असू शकतं. गादीवर झोपून, गादीचा आकार आतील कापसामुळे कमी-जास्त उंच-सखल होतो व अगोदरचे झिजलेले मणके आणखीनच झिजतात. गादीच्या आकारामुळे मणक्यांना योग्य पद्धतीने टेकत नाहीत. त्यामूळे दुसऱ्या तुम्हाला शरीर दुखण्याचा त्रास होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्याने सुद्धा तीव्र पाठदुखीचा त्रास सुरू होतो.

अ‍ॅलर्जीचा धोका कमी करण्यासाठी निरोगी गादी आवश्यक आहे?

गादीमध्ये अनेक धूळ कण अडकून बसतात आणि त्यावर झोपल्याने तुम्हाला अ‍ॅलर्जीचा धोका वाढू शकतो. हे विशेषत: दमा किंवा त्वचेच्या अ‍ॅलर्जीचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी फार धोक्याचं आहे. धूळीचे कण साचलेल्या गादीमुळे ट्रिगर होण्याची शक्यता जास्त असते. अ‍ॅलर्जीने मुक्त, जंतू-प्रतिरोधक आणि पर्यावरणास अनुकूल गादी वापरणं अधिक सोयीस्कर राहतं.

बेडवरीच गादी तुमची जीवनशैली सुधारण्यास कशी मदत करते?

झोपेला अनेकदा सर्वोत्तम स्ट्रेसबस्टर मानलं जातं. म्हणूनच झोप खराब झाली की त्यामूळे तुमची तणाव पातळी वाढत असल्याचं अनेकदा दिसून येतं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, तणावामुळे किशोरवयीन मुलांमध्ये झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असताना त्यांच्यामध्ये या तक्रारी आढळून आल्या आहेत. १८ टक्के किशोरवयीन मुलांनी पुरेशी झोप न घेतल्याने त्यांना त्यांच्या जीवनात तणाव वाढल्याचं आढळून आलं आहे. तर ३६ टक्के लोकांनी सांगितलंय की, गेल्या महिन्यात तणाव जाणवल्यामुळे ते थकले आहेत.

तणावाच्या उच्च पातळीखाली असलेल्या आणखी ३९ टक्के लोकांनी असं देखील म्हटलंय की, खराब झोपेमुळे त्यांचा ताण वाढतो. अपुऱ्या झोपेमुळे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तर काही अभ्यासकांनी सांगितले की, त्यांना अपुऱ्या झोपेमुळे आळशी किंवा सुस्त असल्यासारखं वाटू लागतं. ४२ टक्के लोकांनी चिडचिड होत असल्याची तक्रार नोंदवली तर ३२ टक्के लोकांनी सांगितले की, यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय. २३ टक्के लोकांनी त्यांच्या प्रेरणाशक्ती कमी झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारून केवळ एक गादी तुमची जीवनशैलीची गुणवत्ता उंचावू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your mattress cure your sleep problems find out prp