Ashish Chanchlani Weight Loss: प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि इन्फ्लूएंसर आशिष चंचलानी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चे असतो. आज कोणालाही त्याची वेगळी ओळख सांगण्याची गरज लागत नाही. आशिषने नेहमीच आपल्या अनोख्या टॅलेंट आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा युट्युबर एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी आशिष चंचलानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोंमधील आशिष चंचलानीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे.

त्याचा हा नवा लूक पाहून चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की, त्याने इतक्या कमी वेळात एवढे वजन कसे काय कमी केले? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर आपण त्याच्या वेटलॉस सिक्रेटबद्दल जाणून घेऊ…

आशिष चंचलानीचे वेट लॉस सिक्रेट?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यासाठी आशिष चंचलानीने अतिशय स्ट्रिक्ट डाएट तसेच जिम रूटीन फॉलो केले आहे. चार महिने त्याने संतुलित आहार खाल्ला तसेच बाहेरील जंक फूडपासून पूर्णपणे दूर राहिला.

पोर्शन कंट्रोल

एकाच वेळी पोटभर जेवण्याऐवजी आशिष रोज थोड- थोडं जेवत होता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाण्याच्या या पद्धतीमुळे पचनशक्ती वाढवून चयापचय वाढण्यास मदत होते, ज्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.

कसे होते वर्कआउट रूटीन?

आशिष दररोज सुमारे ४ तास जिमिंग करत होता. ज्यामध्ये कार्डिओ ते स्ट्रेंथ ट्रेनिंग तसेच बॉक्सिंग, बॅटल रोप्स, सायकलिंग आणि रनिंग यांचा समावेश होतो.

चाहत्यांना दिल्या ‘या’ खास टिप्स

दरम्यान आशिषने वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काही खास टिप्सही दिल्या आहेत. आशिष चंचलानी याच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ३ गोष्टी लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे इतरांच्या बोलण्याने नाराज होऊन स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे, लोक तुमची चेष्टा करतात म्हणून जर तुम्हाला स्वतःला बदलायचे असेल तर तुम्ही स्वतःला फार काळ पूश देऊ शकणार नाही. याशिवाय फक्त स्वतःसाठी आणि स्वत:च्या आनंदासाठी बदला.

दुसरे म्हणजे, घाई टाळा. आपण वर्षानुवर्षे वाढवत असलेले वजन केवळ ३ किंवा ४ महिन्यांत कमी करू शकत नाही. अशा परिस्थितीत, स्वत: ला डेडलाइन देणे थांबवा. यात धैर्य सर्वात महत्वाचे आहे. या सर्वांशिवाय स्वतःचे महत्त्व समजून घ्या. स्वतःवर प्रेम करा, तरच तुम्हाला तुमची ताकद कळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber ashish chanchlani lost 15 kg weight in 4 months know how sjr